ETV Bharat / state

Karuna Munde Case करुणा मुंडे विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - संगमनेर पोलिसांत करुणा शर्मांवर गुन्हा

नवीन पक्ष काढण्यासाठी रोख व सोन्याच्या स्वरुपात दिलेल्या सुमारे 34 लाख 45 हजार रुपयांची परतफेड न केल्याच्या फिर्यादीवरुन करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात case registered against Karuna Munde financial fraud case संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर पोलीस
संगमनेर पोलीस
author img

By

Published : Sep 4, 2022, 1:48 PM IST

Updated : Sep 4, 2022, 10:50 PM IST

अहमदनगर - धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच कार्यकर्त्यावर फसवणुकाचा case registered against Karuna Munde financial fraud case गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात वेगळेच बाब समोर आली आहे. त्यामुळे करुणा मुंडेंचे अस्त्र त्यांच्यावर उलटल्याची चर्चा आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी रोख व सोन्याच्या स्वरुपात दिलेल्या सुमारे 34 लाख 45 हजार रुपयांची परतफेड न केल्याच्या फिर्यादीवरुन करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

यापूर्वी करुणा मुंडे यांच्याविरोधात आहे गुन्हा दाखल विवाहित महिलेच्या पतीशी अनैतिक संबंध ठेवून तिच्या संसारात ढवळाढवळ करत महिलेला अश्लिल शिवीगाळ तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. त्याशिवाय पतीकडून तिचा छळ केल्याच्या आरोपावरून करुणा मुंडे/शर्मा हिच्यासह दोघांवर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ( Yerawada Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार करुणा आणि महिलेचा पती यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

करुणाशी प्रेमसंबंध पत्नीचा छळ - फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे रहायला होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा हिच्याबरोबर झाली. ती स्वत:ची ओळख करुणा मुंडे अशी करुन देत असे. फिर्यादीचे पती वारंवार तिच्या घरी जाऊन राहू लागले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. हे प्रकरण फिर्यादी पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने विचारणा केल्यावर त्याने माझे करुणा मुंडेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर तो त्यांचा छळ करू लागला, असा आरोप पत्नीने केला आहे.

करुणा मुंडेकडून फिर्यादीला शिविगाळ - फिर्यादी पत्नी हिने पतीला फोन केल्यानंतर करुणा मुंडेही फोन उचलत असे तसेच तक्रारदार यांना शिवीगाळ करून पतीचा नाद सोड असे म्हणत असे. तसेच त्याला त्रास दिला तर महागात पडेल, अशी धमकी देत होती. तर आम्ही लग्न करणार आहोत. तू नाद सोड. मी पार्टी प्रेसिडेंट आहे, अशा धमक्या देऊन घटस्फोट देण्यासाठी वारंवार धमकावले असल्याचे फिर्यादी तक्रारीत म्हटले आहे.

Last Updated : Sep 4, 2022, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.