ETV Bharat / state

अहमदनगर क्रीडाधिकारी नावंदेंकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल - अहमदनगर क्रीडाधिकारी नावंदेंवर गुन्हा दाखल

पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे श्रीगोंदे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चारूशीला पवार व योगीता ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकातील महिला अधिकार्‍यांनी क्रीडाधिकारी नावंदे यांच्याकडे परवान्याची चौकशी केल्यावर तो त्यांच्याकडे आढळला नाही. त्यामुळे, त्यांना पथकातील महिला अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले.

Navande violating Collector's order
क्रीडाधिकारी नावंदे
author img

By

Published : Jun 18, 2020, 7:41 PM IST

अहमदनगर - जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांना श्रीगोंदा महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्रवासाचा अधिकृत पास नसतानाही दररोज नगर- पुणे प्रवास करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यााने त्यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे श्रीगोंदा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चारूशीला पवार व योगीता ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकातील महिला अधिकार्‍यांनी क्रीडाधिकारी नावंदे यांच्याकडे परवान्याची चौकशी केल्यावर तो त्यांच्याकडे आढळला नाही. त्यामुळे, त्यांना पथकातील महिला अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांना पथकातील माहिला अधिकार्‍यांनी माहिती दिल्यावर पुढे गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला.

जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे या रोज नगर-पुणे असा प्रवास करत होत्या. त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही. प्रवासाचा अधिकृत पास त्यांनी काढलेला नाही. असे असतानाही त्या प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.