अहमदनगर - कोपरगाव शहरात उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. कोपरगाव अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
कोपरगाव शहरातील संभाजी महाराज सर्कल जवळ उभ्या असलेल्या अल्टो कारने अचानक पेट घेतल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील अनुराग पाटील आपल्या परिवारासह कोपरगाव येथील आढाव रुग्णालयात आले होते. त्यांनी त्यांची अल्टो कार रसत्याच्या कडेला उभी केली असता पुढच्या बाजुने अचानक धूर निघून कारने पेट घेतला होती. मात्र, वेळीच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने ही आग विझविल्याने गाडीचे मोठे नुकसान होण्यापासुन टळले आहे. उन्हाच्या काडक्याने कारने पेट घेतली असल्याचे पाटील म्हणाले.