ETV Bharat / state

अहमदनगर: बैलाने घेतला सोन्याचा घास; दागिन्यासाठी गृहिनीला सासरचा धाक - संगमनेर तालुका

संगमनेर तालुक्यातील एका बैलाने नैवेद्यासोबत चार तोळ्याचे गंठण गिळले. मात्र, हे गंठण शेजारी महिलेचे असल्याने घरधन्यासमोर मोठी अडचण उभी राहिला. दरम्यान आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हा दागिना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

बैलाने घेतला सोन्याचा घास
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:10 AM IST

अहमदनगर - पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा त्यांच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी बैलाची विधीवत पुजा करुन त्याचे आभार मानले जातात. मात्र, हे आभार संगमनेर तालुक्यातील एका बैलाला चांगलेच महागात पडले आहेत. या बैलाने औक्षणाच्या ताटातील नैवेद्यासोबत सोन्याचे 'गंठण' गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर शस्त्रकिया करुन हा दागिना बाहेर काढण्यात आला असला, तरी शेतीकामासाठी हा बैल काही कामाचा न राहिल्याने तो विकावा लागल्याची माहिती आहे.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन

संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथील शेतकरी बापूसाहेब प्रभाकर शिंदे यांच्याकडे खिल्लार बैलाची जोडी आहे. पोळ्याच्या दिवशी या बैलांचे औक्षण करतांना यापैकी एका बैलाने पूरणपोळीच्या नैवेद्यासोबत ताटातील चार तोळ्यांचे सोन्याचे 'गंठण'ही गिळल्याचा प्रकार समोर आला होता. हे गंठण शिंदेंच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचे असून पुजेसाठी ते आणण्यात आले होते. यानंतर हे सोनं विष्ठेसोबत बाहेर पडेल याची वाट शिंदे कुटूंबियांनी तब्बल 8 दिवस पाहिली. मात्र, दागिना बाहेर पडला नाही. दरम्यान, सासरच्या मंडळीच्या धाकाने शेजारी महिलेने गंठण परत मिळवण्यासाठी तगादा लावला. मात्र. शिंदेंची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना या दागिन्याचा मोबदला देणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया करून बैलाच्या पोटात अडकलेले गंठण बाहेर काढण्यात आले. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर बैलाची प्रकृती ढासाळली आणि तो शेतीकाम करण्याच्या योग्य राहिला नाही. यामुळे शिंदेंना नाईलाजाने हा बैल विकावा लागला. दरम्यान, सोन्याचे हे औक्षण बैलाला चांगलेच महागात पडले आहे.

हेही वाचा - लोकसभा लढवणार नाही, विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतूनच - पृथ्वीराज चव्हाण

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शेतकरी पोळ्याच्या दिवशी आपल्या बैलांना पुरणपोळीचा गोड घास भरवितात..पण संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बैलाने पुरुन पोळीसोबत ताटातील खऱ्या सोन्याचाच घास खाल्याचा प्रकार समोर आलाय....बैलाने गिळलेले चार तोळे सोने बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यानंतर तो शेतात काम करण्यास समर्थ राहिला नसल्याने मालकावर त्याला विकण्याची वेळ आली....

VO_ संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथील शेतकरी बापूसाहेब प्रभाकर शिंदे यांच्या खिलार बैलाने पोळ्याच्या दिवशी पुरण पोळीच्या नैवेद्यासोबत ताटातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठणही खाल्ले होते. बैलाला ओवाळतात ताटात हे गंठण ठेवले होते..हे गंठण शिंदे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचे होते. पुजेपुरते ते आणण्यात आले होते. मात्र, बैलाने घासासोबत तेही खाल्ले.हे सोने आपोआप बाहेर पडण्याची वाट तब्बल 8 दिवस पाहिली. मात्र तसे झाले नाही. सासरची मंडळी रागवणार म्हणून त्या महिलेने सोने परत करण्याचा तगादा लावला. शिंदे यांची परिस्थिती हलाकीची असल्याने ते त्या बदल्यात सोने देऊ शकत नव्हते. शेवटी त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया करून पोटात अडकलेले गंठण व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. ओवाळताना झालेल्या निष्काळजीपणाची शिक्षा बिचाऱ्या बैलाला भोगावी लागली. मात्र, त्यानंतर त्याची तब्येत फारशी सुधारली नसल्याने तो बैल विकल्याचे शेतकऱ्याने सांगितले. सोन्याचा तो घास बैलाला आणि त्याच्या मालकालाही चांगलाच महागात पडला....Body:mh_ahm_shirdi_bull on Gold_16_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_bull on Gold_16_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.