ETV Bharat / state

तृप्ती देसाईंनी विरोधासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, शिर्डी संस्थानच्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा

शिर्डी देवस्थानाने पोषाखाबद्दल घेतलेल्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा असल्याचे पुणे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी यावेळी सांगितले. देवस्थानच्या या निर्णयाबद्दल तृप्ती देसाईंना काही तक्रार असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे योग्य नाही. देसाई यांनी शिर्डीत येऊन हे फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्यांना तोडीस तोड उत्तर देईल, असा इशारा आनंद दवे यांनी दिला.

शिर्डी
शिर्डी
author img

By

Published : Dec 5, 2020, 3:48 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत घेतलेल्या निर्णयाला आज शिर्डी ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. भारतीय पेहरावात भाविकांनी मंदिरात येण्याच्या निर्णय योग्य असल्याचे महासंघाचे म्हणने आहे. साई संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या आवाहन फलकाची आज पुणे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि शिर्डीतील ब्राह्मण संघाच्या वतीने पुष्पहार घालत श्रीफळ फोडून पूजा केली. तृप्ती देसाईंनी शिर्डी मंदिरात लावण्यात आलेले फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस-तोड उत्तर देईल, असा इशाराही महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला.

शिर्डी

शिर्डी देवस्थानाने पोषाखाबद्दल घेतलेल्या निर्णयाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा असल्याचे पुणे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी यावेळी सांगितले. देवस्थानच्या या निर्णयाबद्दल तृप्ती देसाईंना काही तक्रार असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे योग्य नाही. देसाई यांनी शिर्डीत येऊन हे फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्यांना तोडीस तोड उत्तर देईल, असा इशारा आनंद दवे यांनी दिला असून राज्यातील सर्व हिंदू मंदिरांमध्ये अशा प्रकारचे फलक लावण्यात यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे दवे म्हणाले.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा संस्थानला इशारा

शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानला इशारा दिला आहे. साई संस्थानने असे फलक न हटवल्यास आम्ही स्वतः 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन हे फलक काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मंदिरातील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात, ते फक्त सोवळे नेसतात. यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतलेला नाही, असे नमूद करत तृप्ती देसाई यांनी संस्थानच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.