अहमदनगर - घरगुती वादातून झालेल्या भांडणात मुलानेच आपल्या अजोबाच्या मदतीने वडीलांचा खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगावात घडली आहे. मुलाच्या सावत्र आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नातू आणी अजोबाला अटक केली आहे. बाबुरा छबुराव निकम (वय 51 वर्षे), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ते कोळगावकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत उसाच्या शेताजवळील नालीत एकाचा मृतदेह आढळला होता. पोलीस या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम करत होते. दरम्यान, बाबुराव यांच्या दुसऱ्या पत्नीने घरगुती वादातून सावत्र मुलाने त्याच्या आजोबाच्या (आईचे वडील) मदतीने मारहाण केली. यात बाबुराव यांचा मृत्यू झाला अशी तक्रा दिली केली होती. यावरुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 302, 323 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या, हा दावा चुकीचा - रंजना गवांदे