ETV Bharat / state

राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजेत; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला - shivswarajyayatra

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंच्या कामाचे कौतुक केले असून पुढील मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री असतील याची ग्वाही दिली आहे. मात्र, मंत्री व्हायला राम शिंदे निवडणूक तर आले पाहिजे, असा टोला जयंत पाटीलांनी लावला आहे.

जयंत पाटील
author img

By

Published : Aug 27, 2019, 6:22 PM IST

अहमदनगर - आचारसंहिता लागून निवडणुकांची घोषणा झाली नसली, तरी सत्तेतील आणि विरोधातील सर्व पक्ष यात्रांच्या निमित्ताने जनतेच्या मनोरंजनासाठी मैदानात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या यात्रा असल्याने भाषणांचे चांगलेच युद्ध पेटले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंना मंत्रिपद देतो, अशी घोषणा केली असून मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजे ना! असा टोला जयंत पाटीलांनी लावला आहे.

जामखेड मधे रंगले भाषण युद्ध

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनादेश यात्रा आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली शिवस्वराज्य यात्रा एकाच दिवशी जामखेडकरांच्या भेटीला दाखल झाल्या. विशेष म्हणजे यानिमित्ताने आयोजित दोन्ही यात्रांच्या जाहीर सभेची वेळ ही दुपारी चार वाजताची होती. यामुळे साहजिकच जामखेड शहर आणि पंचक्रोशीत वातावरण भाजप - राष्ट्रवादीमय झाल्याचे रस्तोरस्ती दिसून येत होते. दोन्ही पक्षाचे झेंडे, बॅनर-होर्डिंग्ज एकमेकाला खेटून दिमाखात लावलेली होती. तर सभास्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या परिस्थितीत एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते एकाच परिसरात असताना, पोलीस-प्रशासनाने सुनियोजित नियोजन करून कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याची किमया लीलया पार पाडली. एकंदरीतच या परिस्थितीत दोन्ही बाजूने होणाऱ्या जाहीर सभेत प्रमुख नेते काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. दरम्यान, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, गेली दहा वर्षे पालकमंत्री राम शिंदे हे येथून प्रतिनिधित्व करत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंच्या कामाचे कौतुक केले. तर, पुढील मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री असतील याची ग्वाही देखील दिली.

दरम्यान, राम शिंदेना पुन्हा मंत्री करू या फडणवीस यांच्या वक्तव्याचा मार्मिक समाचार शिवस्वराज्य यात्रेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. मंत्री व्हायला राम शिंदे निवडून तर आले पाहिजेत, असा टोला लावत रोहित यांचे पारडे जड असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लोकसभेला सुजय विखेंमुळे नगर जिल्हा राज्यात एक नंबरवर चर्चेत होता. त्याचप्रमाणे आता शरद पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी पक्षाकडून पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरल्याने हा मतदारसंघ आता पासूनच चर्चेत आहे. दरम्यान, कोणतीही कसर न सोडता दोन्ही बाजूने एकाच दिवशी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेत पदरी पडलेली मानहानी पवार कुटुंबीय पुसण्यात यशस्वी होणार का? हे विधानसभा निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Intro:अहमदनगर- राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजे ना..जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला !! जामखेड मधे रंगले भाषण युद्ध !!Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_bjp_ncp_war_pkg_7204297

अहमदनगर- राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजे ना..जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला !! जामखेड मधे रंगले भाषण युद्ध !!

अँकर- आचारसंहिता लागून निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी सत्तेतले आणि विरोधातील सर्व पक्ष यात्रांच्या निमित्ताने जनतेच्या मनोरंजनासाठी मैदानात दाखल झालेत असेच चित्र सध्या राज्यात पहावयास मिळत आहे. एकाच दिवशी भाजप-राष्ट्रवादीच्या यात्रा नगर जिल्ह्यातील जामखेड मधे आल्याने सोमवारी नेमके हेच चित्र दिवसभर पहावयास मिळाले.

व्हीओ1- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनांदेश यात्रा आणि खा.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली शिव स्वराज्य यात्रा एकाच दिवशी जामखेडकरांच्या भेटीला दाखल झाल्या. विशेष म्हणजे यानिमित्ताने आयोजित दोन्ही यात्रांच्या जाहीर सभेची वेळ ही दुपारी चार वाजेचीच होती. साहजिकच जामखेड शहर आणि पंचक्रोशीत माहोल भाजप-राष्ट्रवादीमय झाल्याचे रस्तोरस्ती दिसून येत होते.. दोन्ही पक्षाचे झेंडे,बॅनर-होर्डिंग्ज एकमेकाला खेटून दिमाखात लावलेली होती तर सभास्थानी कार्यकर्त्यांचा जमावडा खच्चून भरलेला होता.. या परस्थिती एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते एकाच परिसरात असताना पोलीस-प्रशासनाने सुनियोजित नियोजन करून कायदा-सुव्यवस्था बिघडू न देण्याची किमया लीलया पार पाडली.. एकंदरीतच या परस्थितीत दोन्ही बाजूने होणाऱ्या जाहीर सभात प्रमुख नेते काय बोलणार याची उत्सुकता होतीच. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, गेली दहा वर्षे पालकमंत्री राम शिंदे हे येथून प्रतिनिधित्व करत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंच्या कामाचे कौतुक करत पुढील मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री असतील याची ग्वाही दिली..
बाईट- देवेंद्र फडणवीस
व्हीओ2- राम शिंदेना पुन्हा मंत्री करू या फडणवीस यांच्या वक्तव्याचा मार्मिक समाचार शिवस्वराज्य यात्रेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेत मंत्री व्हायला राम शिंदे निवडणूक तर आले पाहिजे असा टोला लागवत रोहित यांचे पारडे जड असल्याचा दावा केला..
बाईट- जयंत पाटील
व्हीओ3- लोकसभेला सुजय विखेंन मुळे नगर जिल्हा राज्यात एक नंबरवर चर्चेत होता, त्याच प्रमाणे आता शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मधून राष्ट्रवादी कडून पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरल्याने हा मतदारसंघ आतापासूनच चर्चेत आहे. सोमवारी एकाच दिवशी शक्तीप्रदर्शनाची संधी साधत दोन्ही बाजूने कोणतीही कसर सोडली न गेल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकात लोकसभेत पदरी पडलेली मानहानी पवार कुटुंब मिटवण्यात यशस्वी होणार का हे विधानसभा निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजे ना..जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला !! जामखेड मधे रंगले भाषण युद्ध !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.