ETV Bharat / state

राष्ट्रवादीची अहमदनगर महापालिकेत भाजपसोबतची मैत्री कायम; स्थायी निवडणुकीसाठी भाजपकडून पाठिंबा

सध्या राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र भाजपच्या विरोधात आहेत. मात्र, अहमदनगर महानगरपालिकेच्या राजकारणात हे समीकरण उलट आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांना पांठिबा दिला आहे.

author img

By

Published : Mar 4, 2021, 10:21 AM IST

Ahmednagar
अहमदनगर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मैत्री

अहमदनगर - महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये असून भाजप विरोधात आहे. असले तरी अहमदनगर महानगरपालिकेत मात्र सुरुवातीपासून भाजपच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली आहे. आता भाजपनेही या बदल्यात स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे.

भाजप महापौर अर्ज भरते वेळी आवर्जून उपस्थित -

भाजप नगरसेवक आणि महापौरांच्या हातात हात घालून राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी आपला सभापतीपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अगदी विरुद्ध जात भाजप आणि राष्ट्रवादीची मैत्री अहमदनगर महापालिकेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील ही मैत्री, त्यांच्यातील समन्वय आणि महानगरपालिकेतील ताळमेळ हे सर्वज्ञात आहेच. राज्यात अजितदादा-फडणवीस फॉर्म्युला जरी फेल गेला असला तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादी-भाजप मैत्रीपूर्ण आघाडीचा फॉर्म्युला जवळपास अडीचवर्षांपूर्वीच यशस्वी झालेला आहे. 2019च्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या शिवसेनेला विरोध म्हणून, तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या भाजपचे महापौर उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आणि पक्षविरोधी भूमिका घेत निवडून आणले. अहमदनगर महानगरपालिकेत स्थानिक राष्ट्रवादीच्या निर्णयामागे आमदार संग्राम जगताप होते. मात्र, तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावेळी फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई केली होती. नगरसेवकांवर पक्ष निलंबनाची केलेली कारवाई देखील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसातच मागे घेतली गेली. त्यानंतर नगरचा भाजप-राष्ट्रवादी पॅटर्न राज्यात चर्चेत आला.

स्थानिक शिवसेनेत अस्वस्थता, पक्षाध्यक्षांकडे तक्रार करणार -

५ मार्चला स्थायी सभापती निवडणूक होत आहे. भाजपने परतफेड म्हणून राष्ट्रवादीचे सभापतीपदाचे उमेदवार अविनाश घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. भाजप महापौर वाकळे यांच्यासह भाजप नसगरसेवकांनी उपस्थित लावत नगरची ही मैत्रीपूर्ण आघाडी कायम असल्याचा संदेश दिला. राज्यात एकीकडे सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी जोमात असली तरी नगरमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेने शिवसेना कोमात आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी सेना-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात होती. मात्र, सध्या राज्यात एकत्र असताना आणि तिन्ही पक्षांचा नंबर एकचा राजकीय शत्रू भाजप असताना नगर महापालिकेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊन शिवसेनेला वारंवार कात्रजचा घाट दाखवत आहेत. शिवसेनेत याबद्दल प्रचंड नाराजी असून उद्धव ठाकरेंकडे स्थानिक सेना नेते तक्रार करणार आहेत.

काही महिन्यांवर असलेल्या नव्या महापौर निवडणुकीत काय होणार -

पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने लवकरच पुढील अडीचवर्षांसाठी नव्या महापौरांची निवड होणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी आहे हीच भूमिका कायम ठेवणार की आघाडी धर्म पाळत शिवसेनेला सोबत घेत सत्ता स्थापन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते आणि शहरावर तब्बल पंचवीस वर्षे आमदार राहिलेले अनिल राठोड यांचे कोरोनाने निधन झाल्याने शहर शिवसेना पोरकी आणि नेतृत्वहीन होत गटातटात क्षीण झाली आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादीचा सेनेसोबत जुळवून न घेण्याचाच पवित्रा असल्याची नांदी स्थायी सभापती निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येत आहे. आता राज्यातील या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.