ETV Bharat / state

जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा भाजपने पराभव मान्य करावा- महसूलमंत्री - ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jan 18, 2021, 10:47 PM IST

अहमदनगर - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्यातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने 80 टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे. भाजपचा दारूण पराभव झाला असून भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीला कौल-

थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास असून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष म्हणून समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाविकास आघाडीला कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखवलेला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

भाजपाने खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा-

आजच्या निकालातून राज्यभर भाजपची झालेली पिछेहाट हे भाजपच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष- देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.