शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील बंधारे ओसंडून वाहत असून या बंधाऱ्याचे पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागातील श्रीरामनगर, साईच्छानगर, हेडगेवारनगर तसेच संस्थानचा साईनाथ रुग्णलायत शिरले असल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी करुन शिर्डी नगरपंचायत प्रशासनाला सदरील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने सुचना केले आहे.
अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही अवस्था - राधाकृष्ण विखे-पाटील - shirdi flood situation latest news
यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असल्याने त्यामुळे शेतातील विहीर, तलाव पूर्ण क्षमतेने भरून पावसाचा प्रत्येक थेंब पाण्याबरोबर वाहत येऊन हे पाणी शिर्डी शहरात येऊन पोहोचले आहे. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी शहरात जुन्या लेंडीनाल्याला आलेल्या पुरामुळे श्रीरामनगर, पुनमनगर, हेडगेवारनगरमध्ये जाऊन पाहणी करत येथील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले.
अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही परिस्थिती
शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील बंधारे ओसंडून वाहत असून या बंधाऱ्याचे पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागातील श्रीरामनगर, साईच्छानगर, हेडगेवारनगर तसेच संस्थानचा साईनाथ रुग्णलायत शिरले असल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी करुन शिर्डी नगरपंचायत प्रशासनाला सदरील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने सुचना केले आहे.
Last Updated : Sep 20, 2020, 4:48 PM IST