ETV Bharat / state

संजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक, नगरमध्ये 'जोडे मारो' आंदोलन - अहमदनगर भाजप 'जोडे मारो' आंदोलन

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने राज्यभर जोरदार आंदोलने सुरू केली आहेत. अहमदनगर शहरात गुरुवारी भाजपच्या वतीने राऊत यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Jan 16, 2020, 10:34 PM IST

अहमदनगर - छत्रपती उदयनराजे भोसलेंना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी वातावरण तापले आहे. याचे पडसाद अहमदनगर येथेही पहायला मिळाले. गुरुवारी शहर भाजपच्या वतीने राऊत यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. संजय राऊतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी समज देऊन कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

भाजपचे नगरमध्ये 'जोडे मारो' आंदोलन

राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये 'माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा,' असे वक्तव्य केले होते. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या गँगस्टर करीम लाला याला भेटत असत, असेही त्यांनी वक्तव्य केले होते.

हेही वाचा - राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचे राज्यभरात पडसाद; उदयनराजे समर्थक रस्त्यावर

इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर राऊतांनी ते वक्तव्य मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, उदयनराजेंच्या वक्तव्यावर ते अजूनही ठाम असल्याने भाजपने राज्यभर जोरदार आंदोलने सुरू केली आहेत. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाच्या निमित्ताने सुरू झालेला वाद संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर अजून पेटला आहे.

Intro:अहमदनगर- संजय राऊतांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; भाजपचे नगरमध्ये जोडोमारो आंदोलन..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_protest_against_raut_pkg_7204297

अहमदनगर- संजय राऊतांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; भाजपचे नगरमध्ये जोडोमारो आंदोलन..

अहमदनगर- छत्रपती उदयनराजेंना वंशज असल्याचे पुरावे मागितल्या वरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात चांगलीच राळ उडाली आहे. याचाच प्रत्येय आज अहमदनगर मधे आला. आज गुरुवारी शहर भाजपच्या वतीने राऊत यांच्या फोटोला जोडोमारो आंदोलन करून त्यांचा निषेध केला. संजय राऊत यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी समजदेवुन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली..
खा.संजय राऊत यांनी एका प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात मा.खा.उदयनराजे यांना वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, तसेच स्व. इंदिरागांधी या करीमलाला याला पायधुनीला भेटत असत असे वक्तव्य केले होते. इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करतात राऊत यांनी ते वक्तव्य मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे,मात्र उदयनराजें वरील वक्तव्यावर ते अजूनही ठाम असल्याने आता भाजप ने राज्यभर जोरदार आंदोलने सुरू केली आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाच्या निमित्ताने सुरू झालेला वाद संजय राऊत यांच्या वक्तव्या नंतर अजून पेटला असून दोन्ही बाजूने त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण सुरू असल्याचे पुढे येत आहे.

बाईट१) भैय्या गंधे -भाजप शहर जिल्हाध्यक्ष
२) मालन ढोणे -उपमहापौर
३)पोपट लोढा -भाजप पदाधिकारी

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- संजय राऊतांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; भाजपचे नगरमध्ये जोडोमारो आंदोलन..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.