ETV Bharat / state

साई संस्थानला आलेल्या देणगीतील नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आरबीआयने बोलावली बैठक

साईबाबांना देणगी म्हणून आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँकेने मुंबईत बैठक बोलावली आहे. मुंबईत आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होत आहे

author img

By

Published : Jun 19, 2019, 4:32 PM IST

साई संस्थान आणि आरबीआयची आज बैठक

अहमदनगर - साईबाबांना देणगी म्हणून आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँकेने मुंबईत बैठक बोलावली आहे. मुंबईत आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होत आहे. यासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

साईबाबांना भाविक रोज लाखो रुपयांचे दान टाकत असतात. यात सोने, चांदी, परकीय चलन, नोटा याबरोबरच मोठ्या प्रमाणावर नाणीही असतात. संस्थान आठवड्यातून दोनदा संस्थानाला आल्येल्या दानाची मोजदाद करत असते. संस्थानला आलेली देणगी बँक प्रतिनिधींवर धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोजून राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येते.

साई संस्थान आणि आरबीआयची आज बैठक

सद्या शिर्डीत बँकामध्ये अडीच कोटीहून अधिक रकमेची नाणी पडून आहेत. काही बँकांकडे आता नाणी ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे १५ जून रोजी बँकांनी चिल्लर घेण्यास नकार दिल्याने संस्थानला दानपेटीतील रकमेची मोजदाद करता आली नव्हती. यावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरबीआयला पत्र पाठवून यात मार्ग काढण्याची विनंती केली होती. याविषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने आज मुंबईत बैठक बोलावली आहे. आता यामध्ये काय निर्णय होणार यावर साई संस्थान सांध्यकाळी ६ वाजता पत्रकार परिषेद घेऊन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर माहिती देणार आहेत.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ साईबाबांना दानात आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझव्ह् बँकेने मुंबईत बोलावली आहे बैठक..मुंबईत आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होत आहे..यासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत....

VO_साईबाबांना भाविक रोज लाखो रुपयांचे दान टाकत असतात..यात सोने, चांदी, परकीय चलन, नोटा बरोबरच मोठ्या प्रमाणावर नाणी असतात..संस्थान आठवड्यातून दोनदा बाबांना आल्येल्या दानाची मोजदाद करत असते..संस्थानला आलेली देणगी बँक प्रतिनिधींव धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोजून राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येते....

VO_ सद्या शिर्डीत बँका मध्ये अडीच कोटी हुन अधिक रकमेची नाणी पडून आहेत, काही बँकांकडे आता नाणी ठेवण्यास जागा नाही, त्यामुळे १५ जून रोजी बँकांनी चिल्लर घेण्यास नकार दिल्याने संस्थानला दानपेटीतील रकमेची मोजदाद करता आली नव्हती..यावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरबीआय ला पत्र पाठवून यात मार्ग काढण्याची विनंती केली होती.तसेच माध्यमातून सुद्धा हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता त्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी आरबीआय ने आज मुंबईत बैठक बोलावली आहे....काय निर्णय या बैठकीत होणार यावर साई संस्थान सांध्यकाळी 6 वाजता पत्रकार परिषेद घेऊन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर माहिती देणार आहेत....Body:MH_AHM_Shirdi Coin Problem_19 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Coin Problem_19 June_MH10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.