अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. तरी शिवसेनेच्या सभास्थळावरील मुख्य बँनरवर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या फोटोला स्थान देण्यात आले आहे.
शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला सुजय यांच्यासह बाळासाहेब विखे पाटील यांच्या समर्थकांची गरज भासत आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नगर दक्षिण मतदारसंघातही जाहीर सभास्थळी बाळासाहेब विखे पाटील यांच्या फोटोचा वापर करण्यात आला. त्यासोबत आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातही युतीच्या बँनरवर फोटो दिसत आहे. आता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.