अहमदनगर - नगर दक्षिणमधून विद्यमान खासदार दिलीप गांधींना डावलून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी नाकारलेले दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी नाराजीतून निवडणूक लढवण्याचानिर्णय घेतला होता. तो अखेर त्यांनी मागे घेतला. हा निर्णय मी राधाकृष्ण विखे यांनी माझ्या वडीलांना विनंती केल्यामुळे घेतला असल्याचे सुवेंद्र यांनी स्पष्ट केले. यामुळे विखे पाटील काँग्रेसचे नेते आहे की भाजपचे? हा प्रश्न विचारला जात आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी मला उमेदवारी दाखल न करण्याची विनंती केली. दोन दिवसापूर्वी पक्षाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक व मंत्री राधाकृष्ण विखे हे पुन्हा घरी आले आणि विनंती केली. माझे वडील खासदार दिलीप गांधी यांनी मला आधीच उमेदवारी अर्ज न भरण्याच्या सूचना केल्या होत्या. मी माझ्या आई-वडिलांचा ऐकणारा मुलगा आहे. म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते हे स्वतः दोन वेळेस आमच्या घरी येतात तसेच राज्य राज्याचे संघटनमंत्री ही येतात, तेव्हा त्यांच्या विनंतीला मी मान दिला, असा उपरोधिक टोला सुरेंद्र यांनी सुजय यांचे नाव न घेता लगावला. यापुढे मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सुवेंद्र यांनी सुजय विखेंच्या विरोधात उभे राहु नये, तुमच्या पाठीशी पक्ष भविष्यात नेहमी उभा राहील, असे आश्वासन भाजपचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी दिले. सोबतच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दोनदा निवासस्थानी भेटून विनंती केल्याने अर्ज मागे घेत असल्याचे सुवेंद्र यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे भाजपच्या संघटन मंत्र्यांच्या जोडीने काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असलेले राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत सुवेंद्र यांची मनधरणी झाल्याने मोठा चर्चेचा विषय झाला आहे. सुवेंद्र गांधी यांनी राधाकृष्ण विखे यांनी विनंती केल्याचे मान्य केले आहे.
काँग्रेसचे स्टार प्रचारक विखे वादाच्या भोवऱ्यात -
सुजय विखे यांची उमेदवारी सुरुवातीपासून विरोधी पक्ष नेते विखे पाटील चांगलेच चर्चेत आहेत. मुलाच्या उमेदवारी वरुन राधाकृष्ण विखेंची भूमिका त्यांच्यासाठी नवे वाद तयार करत आहे. सद्या विखे भाजपच्या संघटन मंत्र्यासोबत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे पुढे येत आहे. विखेंच्या या भूमिकेवर आघाडीच्या सभेत २ एप्रिलला बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांनी विखेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुराणिक-विखे-सुवेंद्र गांधी यांच्या एकत्रित बैठकीचा फोटो माध्यमात आल्या नंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राधाकृष्ण विखे यांनीही आपण लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितल्यानेते राजकीय भूकंप करतात की त्या अगोदरच पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करणार हेही पाहावे लागणार आहे.
मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे . त्यामुळे मला अनेक पदांवर काम करता आले. वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व जिल्ह्यात पक्षाचे काम केली. मात्र १९९९ दिलीप गांधींना जिल्हाध्यक्षपदासाठी डावलले, १९९६ ला लोकसभेसाठी त्यांचे तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांना लोकसभेला उमेदवारी देण्यात आली. नंतर २००४ ला लोकसभेचे तिकीट कापले. असा पक्षाकडून अन्याय झाला असला तरी खासदार दिलीप गांधींची पक्षनिष्ठा कणभरही कमी केली नाही.