ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध उपोषणाला बसणार महसूल मंत्री थोरात - बाळासाहेब थोरात करणार उपोषण

शेतकरी, कामगार देशोधडीला लागत असताना झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा असून राज्यभर उपोषण करुन काँग्रेस नेते बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

Balasaheb Thorat will go on a hunger strike on Friday
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात करणार उपोषण
author img

By

Published : Mar 25, 2021, 9:19 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - केंद्र सरकारने चर्चेविना मंजूर केलेले तीन शेतकरी कायदे आणि कोरोना काळात आणलेल्या कामगार विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मागील चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या होणाऱ्या भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात शुक्रवारी 11 वाजता श्रीरामपूर येथे उपोषण करणार आहेत.

केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी
कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील 100 दिवसांपापेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या मात्र तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे, असा काँग्रेसह विरोधकांचा दावा आहे. मात्र मोदी सरकार या बाबींवर बोलायलाही तयार नाही. तर दुसरीकडे इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचे विरोधक म्हणत आहेत. पेट्रोल 100 रुपये लिटर तर गॅस सिलिंडर 850 रुपयांवर गेले आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. देशातील शेतकरी, कामगार देशोधडीला लागत असताना झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा असून राज्यभर उपोषण करुन काँग्रेस नेते बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथे महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.