ETV Bharat / state

नरेंद्र मोदी-शरद पवारांची भेट आश्चर्याने घेण्याची गरज नाही - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अनेक विषयांबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटले असतील, असे सांगत काँग्रेसचे जेष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारच्या मोदी-पवार भेटीवरील तर्कवितर्कांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला.

balasaheb thorat reaction on sharad pawar narendra modi meeting
नरेंद्र मोदी-शरद पवारांची भेट आश्चर्याने घेण्याची गरज नाही - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jul 17, 2021, 11:47 PM IST

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची आजची भेट फार आश्चर्याने घेण्याची गरज नाही. अनेक विषयांबाबत चर्चा करण्यासाठी पवार पंतप्रधानांना भेटले असतील, असे सांगत काँग्रेसचे जेष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारच्या मोदी-पवार भेटीवरील तर्कवितर्कांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलताना....
यासाठी पवार मोदींना भेटले असतील
मराठा व ओबीसी आरक्षण, कृषी कायद्यांवर सुरू असलेला शेतकऱ्यांचा विरोध, सहकार मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न, पुरेशा लसीच्या डोसची आवश्यकता किंवा केंद्राकडे अडकलेला जीएसटीचा तीस हजार कोटींचा परतावा या विषयांवर सुद्धा पवार पंतप्रधांनाना भेटले असु शकतात, असा अंदाजही थोरात यांनी व्यक्त केला. भाजपचा सत्ता स्थापनेसाठी अनेक मार्गांनी प्रयत्न सुरू आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. भाजपचा विचार लोकहिताचा नाही. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेसच्या काळात ईडी माहित नव्हती
रात्रीतुन कोणालाही अटक होऊ शकते, ह्या चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावरुन ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांच राजकीयकरण झाल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपला मदत करण्याचे काम या एजन्सीकडून होत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. काँग्रेसच्या काळात ईडी हा प्रकारही कुणाला माहित नव्हता, असेही ते म्हणाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार का? याबाबत बोलतांना थोरात यांनी भाजपला सत्तेपासुन दूर ठेवण्यासाठी जे आवश्यक असेल ते करू, असे सांगितलं.

साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले का?
यापुर्वी काँग्रेसकडे असलेले साई संस्थानचे अध्यक्षपद आता राष्ट्रवादीकडे गेले का? याबाबत विचारले असता, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्हाला सत्तेतील वाटा योग्य पद्धतीने मिळत आहे. लवकरच विश्वस्त मंडळाची नियुक्ती होईल, असे स्पष्ट केले.

पुढील काळ काँग्रेसचा

शिर्डी मतदारसंघात पुढील काळ काँग्रेसचा असेल. शिर्डी व राहाता नगरपालिकेच्या तयारीला लागा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. अनेकदा काँग्रेसला कठीण प्रसंगातून जावे लागले. त्यातुन पक्ष उजळून बाहेर पडल्याचा इतिहास आहे. शेतकरी आंदोलन, कोरोनाच संकट मोदी सरकारकडून दुर्लक्षीत झाल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.

हेही वाचा - VIDEO : धगधगत्या आगीत उभे राहून टीडीपी कार्यकर्त्यांचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

हेही वाचा - पोटाच्या ऑपरेशनकरिता केली बचत, उंदरांनी कुरतडल्या 2 लाखांच्या नोटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.