ETV Bharat / state

अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेची खंडपीठात धाव, पुढील आठवड्यात सुनावणी.. - बाळ बोठेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

खा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज.बोठे सध्या फरार आहे. दरम्यान, बोठे याने या हत्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्याच्या पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

jare murder
अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेची खंडपीठात धाव
author img

By

Published : Jan 6, 2021, 12:21 PM IST

अहमदनगर- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज.बोठे यांने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. हत्येच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात सात डिसेंबर रोजी अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर बोठे याने 31 डिसेंबर रोजी एडवोकेट संतोष जाधव यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे अॅड. जाधवर यांनी सांगितले.

पोलिसांकडून स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज-

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या महिनाभरापासून फरार आहे. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहे, तो मात्र काही पोलिसांना सापडेना. दरम्यान शोध घेऊनही सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी अहमदनगर पोलिसांनी पारनेर न्यायालयात स्टॅंडिंग वॉरंट(फरार घोषित करण्यासाठी) साठी अर्ज दाखल केला आहे.

वकिलांकडून हस्तक्षेप अर्ज-

या स्टँडिंग वॉरंटला बोठेच्या वकिलांनी पारनेर न्यायालयात आव्हान दिले आहे, त्याने अॅडव्होकेट संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पारनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी बोठे यांच्यावतीने अॅडव्होकेट ठाणे यांनी युक्तिवाद केला की, आमच्या आशिलाने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात अर्ज करण्यात आलेला आहे. यावर निर्णय होण्याआधी पोलिसांनी स्टॅंडिंग वॉरंट साठी अर्ज केला आहे. आरोपीला अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बोठे हा अटक टाळत नसून जामिनासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिसांचा स्टॅंडिंग अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद करण्यात आला. या अर्जावर बुधवारी निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.