शिर्डी - तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून बेपत्ता झालेल्या इंदूरच्या दीप्ती सोनी प्रकरणी शिर्डी व नगर पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. शिर्डीतून लोकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण बघता यात मानवी तस्करी किंवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, अशी शंका उपस्थित करत याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लक्ष घालण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
साई दर्शनासाठी आलेले इंदूर येथील भाविक मनोज सोनी यांची पत्नी दीप्ती सोनी १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डीतून बेपत्ता झाल्या. याबाबत सोनी यांनी शिर्डी पोलीसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही यश न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली. बेपत्ता व्यक्तींचा तातडीने शोध घेण्याबरोबरच यात मानवी किंवा अवयव तस्करी तर नाही ना, अशी शंका उपस्थीत करत शिर्डी पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पोलीस आजवर विशेष काहीही करू शकले नाहीत. शिर्डी पोलिसांनी नुकताच याबाबत दिलेला अहवालही डोळ्यात धुळफेक करणारा असून जिल्हा पोलीस प्रमुखही तपासात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिर्डीतील बेपत्ता लोकांच्या वाढत्या आकडेवारीने चिंतीत झालेल्या न्यायालयाने बेपत्ता व्यक्तींचा तपास करून यामागे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट शिर्डीत कार्यरत आहे का, याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी लक्ष घालण्याच्या सूचना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. यू. देबडवार व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिला आहे.
दीप्ती सोनी प्रकरण : शिर्डी पोलिसांच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाची नाराजी
दीप्ती सोनी प्रकरणी शिर्डी व नगर पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.