ETV Bharat / state

पोलीस आणि होमगार्डवर दगडफेक, पोलीस शिपाई जखमी

विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या काहींना पोलीस व होमगार्डने हटकले असता त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी घडली. या पोलीस शिपाई जखमी झाला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

pathardi police station
pathardi police station
author img

By

Published : Aug 16, 2020, 1:40 PM IST

पाथर्डी (अहमदनगर) - विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांना पोलीस व होमगार्डने जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. ही घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमार घडली. यात पोलीस शिपाई व होमगार्ड जखमी झाले असून आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अरुण शेकडे हे खरवंडी कासार येथे रात्री कर्तव्यावर असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास मारुती बडे व त्याचा साथीदार मोटारसायकलवरून फिरताना आढळून आले. त्यावेळी पोलीस शिपाई शेकडे व होमगार्ड मल्हारी बडे यांनी मारुती बडे व त्याच्या साथीदारास हटकले असता ते मोटारसायकल घेऊन पळू लागले त्यानंतर शेकडे व होमगार्ड बडे यांनी आरोपी मारुती बडे व त्याच्या साथीदारास संग्राम बिअर शाॅपीजवळ आडवून विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता तुम्ही आमचे काहीच करू शकत नाहीत, असे म्हणत पोलीस व होमगार्डवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

यात पोलीस शिपाई शेकडे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते खाली कोसळले अंधाराचा फायदा घेत आरोपी मारुती बडे व त्याच्या साथीदार घटनास्थळावरुन पसार झाले. जखमी शेकडेस होमगार्ड मल्हारी बडे यांनी पाथर्डी पोलीस प्रशासनाला संपर्क करत रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीस शिपाई व होमगार्ड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारुती बडे व त्याच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मारुती बडे हा भिलवडे येथील रहिवासी असून पुण्यात महावितरण विभागात नोकरीस असल्याचे समजते. पुढील तपास ठाणे अंमलदार रमेश बाबर हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.