ETV Bharat / state

संगमनेरमध्ये विखेंविरोधात थोरात समर्थकांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना समज - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगरमधील विखे विरूद्ध थोरात हा संघर्ष कायम राहिलेला आहे. यावेळी तर विखे-पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी विखे-पाटील यांच्या गाडीचा ताफा अडवून थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संगमनेरमध्ये विखेंविरोधात थोरात समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:51 PM IST

अहमदनगर - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात थोरात समर्थकांनी बुधवारी संगमनेरमध्ये घोषणाबाजी केली. विखे-पाटील हे निमगाव भोजापूर येथे आले थोरात कार्यकार्त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय विखे घेत असल्याचा आरोप केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत समज दिली.

संगमनेरमध्ये विखेंविरोधात थोरात समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

हेही वाचा - कसब्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेस देणार का धक्का? इच्छुकांची गर्दी वाढवणार भाजपची डोकेदुखी

गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर व राजापूर येथे आले होते. उर्ध्व प्रवरा डाव्या कालव्यावरील म्हाळुंगी पुलाचे उद्धाटन तसेच उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) कालवा कामांचा शुभारंभ मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला. विखे हे संध्याकाळी निमगाव भोजापूर येथे जात असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात समर्थकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखत पुलाच्या उद्घाटन झाल्यानंतर कार्यंकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर विखे राजापूरकडे निघाले असता थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथे आले असताना कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.... या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत बाजूला नेले....

VO_ गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर व राजापूर येथे आले होते. उर्ध्व प्रवरा डाव्या कालव्यावरील म्हाळुंगी पुलाचे उदघाटन तसेच उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) कालवा कामांचा शुभारंभ मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला. विखे हे संध्याकाळी निमगाव भोजापूर येथे जात असताना कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात समर्थकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता.पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखत पुलाच्या उदघाटन ठिकाणी जावू न देता सरकारी वाहनात बसवून ठेवले. उदघाटन झाल्यानंतर त्यांना वाहनातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर विखे राजापूरकडे निघाले असता थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत बाजूला नेले..दरम्यान काही वेळ वातावरण तणावपुर्ण बनले होते....Body:mh_ahm_shirdi_vikhe × thorat_19_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vikhe × thorat_19_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.