ETV Bharat / state

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हजारो साई भक्त शिर्डीत दाखल - साईबाबा संस्थान शिर्डी

आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) हजारो साई भक्त शिर्डीत दाखल ( Sai Bhakt enters Shirdi ) झाले आहेत. साईबाबा संस्थाननेही एकादशीच महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी विशेष काळजी घेतली आहे.

Thousands of Sai devotees in Shirdi on the occasion of Ashadi Ekadashi ....
आषाढी एकादशी निमित्त हजारो साईभक्त शिर्डीत दाखल....
author img

By

Published : Jul 10, 2022, 5:37 PM IST

शिर्डी - महाराष्ट्राच अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात ( Crowd of devotees Vitthal Pandharpur ) दिसून येत असतांना साईबाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केलीय. शिर्डी माझे पंढरपुर हि आरती साईबाबा मंदीरात नित्य निमयमान म्हटली जाते. त्याचीच प्रचीती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीन दिसून येत. साईबाबा संस्थाननेही एकादशीच महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाण्याची खिच़डी बनवली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त हजारो साई भक्त शिर्डीत

शिर्डी माझे पंढरपुर अशी रचना - साईबाबां असतांना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपुरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत. दासगणुंची एक आषाठी वारी चुकली, विठ्ठल दर्शनासाठी आतूर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले. तेव्हा पासून दासगणु महाराजांनी शिर्डी माझे पंढरपुर अशी रचना केली.आजही साईमंदीरात बाबांच्या मंगलस्नानंतर हिच आरती म्हटली जाते. असंख्य भाविक बाबांनाच विठ्ठलाचे रूप मानुन दर आषाढीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जावून विठ्ठलरुपी दर्शन घेवून धन्य होतात.

साईबाबांच्या मुर्तीला तुळशीची माळ - आषाढी एकादशीच महत्व लक्षात घेवून विठ्ठलाची प्रतीमा साईबाबांच्या समाधीवर ठेवून मुर्तीला तुळशीमाळ तसेच सुवर्ण आभुषणे चढवली आहे. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र, फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेवुन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर शाबुदान्याची खिचडी, झिरक हेच जेवण म्हणून देण्यात येत आहे.

साईंच्या रथाची मिरवणूक - आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान विठ्ठल रुखमिणीची प्रतीमा ठेवुन साईंच्या रथाची मिरवणुक शिर्डी गावातून काढण्यात येते. ​एकादशीच्या शुभ मुहूर्तावर रंगीबेरंगी फुलांनी साई मंदिर परिसर फुलून गेला आहे. बंगलोर येथील साईभक्त प्रकाश यांनी आपल्या स्वताचा खर्चातून साई मंदिर फुलाने सजविल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठे आकर्षण ठरत आहे.

हेही वाचा - Vitthal Mahapuja By CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तीन पिढ्यांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा, ... हे घातले साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.