ETV Bharat / state

'बोली'वाल्या सरपंचांना अण्णा हजारेंच्या कानपिचक्या - सरपंच निवडणुकीवर अण्णा हजारेंचे पत्र

लिलाव पद्धतीने सरपंच पदाची निवड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अण्णांनी ही नाराजी जाहीर केली आहे.

anna hazare critisize on auction for sarpanch selection
'बोली'वाल्या सरपंचांना अण्णा हजारेंच्या कानपिचक्या
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:14 PM IST

अहमदनगर - समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही गावांत बोली लावून लिलाव पद्धतीने सरपंच पदाची निवड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अण्णांनी ही नाराजी जाहीर केली आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत सरपंच पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव आहे, असे उद्विग्न मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

स्वातंत्र्य आणि लोकशाही इतिहासाचे भान ठेवा -

देशात लोकशाही यावी, यासाठी नव्वद वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन, अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची, असे त्यांचे स्वप्न होते. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, असेही हजारे यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही यावी, यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान केले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले की काय, तसेच 70 वर्षात लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंचायतराजसाठी ग्रामसभा ही सर्वोच्च आहे -

पंचायत राज मजबूत व्हावे, यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च आहे. ग्रामसभा ही गावची संसद आहे. या घटकांनी एक दुसऱ्यांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबूत करावयाची आहे. कारण आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडून पाठविते. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असणारे चारित्र्यशील उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून पाठवायचे आहेत. सरपंच पदाचा लिलाव झाला, तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकशाहीची मंदिरे पवित्र ठेवा -

प्रत्येक ग्रामसभांनी हा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिल्लीची संसद लोकसभा किंवा राज्याची संसद विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. त्यांचे पावित्र्य राहण्यासाठी ग्रामसभा, ग्रामपंचायत यांची फार महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण ग्रामसभा ही सार्वभौम असून, स्वयंभू आहे. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते, अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे, हा लोकतंत्राचा लिलाव आहे, असेही ते म्हणाले.

जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार -

जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. तसेच ग्रामसभेमध्ये गावातील सर्व मतदारांच्या संमतीने अविरोध निवडणूक करून निवडणूक करणे, हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो. तसेच नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहे.

हेही वाचा - आग्रा-लखनऊ मार्गावर अनेक वाहनांचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.