ETV Bharat / state

...म्हणून अण्णा हजारे धारण करणार मौन; उपोषणाचाही दिला इशारा

सरकारने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तातडीने पाऊल उचलावे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहेत. सरकारने पावले न उचलल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

hajare
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:06 PM IST

अहमदनगर- दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन ७ वर्षे उलटली, तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. देशात जलद गती न्यायालयात लाखो प्रकरणे पडून आहेत. न्याय आणि शिक्षेला उशिर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशिर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहेत. सरकारने पावले न उचलल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतीकुमार चौधरी प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला उशिर होणे नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहित करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - 'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबादचे एन्काऊंटर योग्यच - अण्णा हजारे

बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. जलद गती न्यायालयात ६ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उपयोगाविना पडून आहे. हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही. 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदी गोष्टींवर अण्णांनी बोट ठेवत पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

Intro:अहमदनगर- वाढत्या महिला अत्याचारावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार, उपोषणाचा दिला इशारा..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_on_hunger_image_7204297

अहमदनगर- वाढत्या महिला अत्याचारावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार, उपोषणाचा दिला इशारा..

अहमदनगर- दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत या साठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार आहेत. सरकारने तातडीने पावले न उचळल्यास बेमुदत उपोषण आंदोलन करू असा इशारा पण अण्णांनी दिला आहे. आज अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून देशात वाढते महिला अत्याचार आणि हत्या बाबत चिंता व्यक्त करताना अशा प्रकरणात न्यायाला आणि प्रत्येक्ष शिक्षेला होणाऱ्या अक्षम्य विलंबा बाबत नाराजी स्पष्ट केली आहे.
दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैद्राबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रौत्साहित करणारा ठरत असल्याचे म्हंटले आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदींवर अण्णांनी बोट ठेवत पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात शेवटी अण्णांनी निर्भया प्रकरणी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल येत्या 20 डिसेंम्बर पासून मौन धारण करणार असल्याचे सांगतानाच सरकारने याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- वाढत्या महिला अत्याचारावर चिंतीत अण्णा हजारे 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार, उपोषणाचा दिला इशारा..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.