ETV Bharat / state

माझ्याकडील पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हेच - अण्णा हजारे

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. शिखर बँक घोटाळ्यात तब्बल २५ हजार कोटींचे कर्ज वाटल्याचे प्रकरण आहे.

आण्णा हजारे
author img

By

Published : Sep 26, 2019, 8:39 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार तसेच माजी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर 'सक्तवसुली संचलनालया'ने (ईडी) मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अण्णा हजारे यांनी याबद्दल गुरूवारी खुलासा केला. माझ्याकडे आलेल्या पुराव्यात अजित पवार व इतरांची या प्रकरणात नावे आली होती. मात्र, त्यात शरद पवार यांचे नाव नव्हते. पवारांचे नाव यात कसे आले हे आता ईडीच्या चौकशीतच बाहेर येईल, असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

आण्णा हजारे

हेही वाचा - शरद पवार यांच्यावरील कारवाईचा औरंगाबाद राष्ट्रवादीकडून निषेध

राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात ईडीने ही कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिखर बँक घोटाळ्याची चौकशी आणि कारवाईची मागणी केलेल्या अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यामध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नसल्याचे ते म्हणाले. मात्र, संगनमत करून शिखर सहकारी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, यावर ते ठाम आहेत.

हेही वाचा - पवारांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून शिवसेनेने साधला 'निशाणा'

नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप आणि आजारी साखर कारखान्यांची विक्री असा दोन टप्प्यात हा घोटाळा असून या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अण्णांनी केली.
पुरावे देऊनही सीआयडीचे डीआयजी जय जाधव यांनी अहवालात तथ्य नसल्याचे म्हटल होते, त्यामुळे त्यांना देखील दोषी धरावे, अशी मागणी अण्णांनी यावेळी केली.

हेही वाचा - पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्प का? इतिहासात दडलीत कारणे!

Intro:अहमदनगर- माझ्याकडे आलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हते -अण्णा हजारे  Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_on_ed_bite_7204297

अहमदनगर- माझ्याकडे आलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हते -अण्णा हजारे  

अँकर - माझ्याकडे आलेल्या पुराव्यात अजित पवार आदी बँकेशी संबंधितांची नावे आली होती, मात्र त्यात शरद पवार यांचे नाव नव्हेत, ते कसे आले हे ईडीच्या चौकशीतच समोर येईल असे स्पष्टीकरण समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे. राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात ईडीनं ही कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिखर बँक घोटाळ्याची चौकशी आणि कारवाईची मागणी केलेल्या अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यात मध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नाही, ईडी ने कारवाई केली. ईडीने का कारवाई केली काही दिवसांनी पुढे येईल. मात्र  संगनमत करून शिखर सहकारी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय. नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप आणि आजारी साखर कारखान्यांची विक्री असे दोन टप्यात हा घोटाळा असून या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अण्णांनी केली.
पुरावे देऊनही सीआयडीचे  डीआयजी जय जाधव यांनी अहवालात तथ्य नसल्याचं म्हटल होते, त्यामुळे त्यांना देखील दोषी धराव अशीहि मागणी अण्णांनी केली आहे. 

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट - अण्णा हजारे. जेष्ठ समाज सेवक.Conclusion:अहमदनगर- माझ्याकडे आलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हते -अण्णा हजारे  
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.