ETV Bharat / state

'शासन-प्रशासनाचे ऐका, घरातच बसून कोरोनाला हरवा'

अण्णांनी आज एका व्हिडिओ संदेशात जनतेने बाहेर गर्दी न करता घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आपण ही लढाई एकीच्या बळावर नक्कीच जिंकू मात्र त्यासाठी थोडा त्रास सहन करून संयम पाळण्याची गरज असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

'शासन-प्रशासनाचे ऐका, घरातच बसून कोरोनाला हरवा'
'शासन-प्रशासनाचे ऐका, घरातच बसून कोरोनाला हरवा'
author img

By

Published : Apr 4, 2020, 11:09 PM IST

अहमदनगर - जगाबरोबर भारताला पण कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. पण शासन, प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे या शत्रुविरोधात यशस्वी लढा द्यायचा आहे. त्यामुळे जनतेने सरकार आणि प्रशासन ज्या गोष्टींचे पालन करायला सांगत आहे, ते केलेच पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

'शासन-प्रशासनाचे ऐका, घरातच बसून कोरोनाला हरवा'

अण्णांनी आज एका व्हिडिओ संदेशात जनतेने बाहेर गर्दी न करता घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आपण ही लढाई एकीच्या बळावर नक्कीच जिंकू मात्र त्यासाठी थोडा त्रास सहन करून संयम पाळण्याची गरज असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे, हे आपला देश एकसंघ असल्याचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.

डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यांचे मानावे एवढे आभार कमी आहेत. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे आणि त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत, असेही अण्णांनी संदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.