ETV Bharat / state

रेमडेसिवीर, ऑक्सिजन तुटवड्याच्या निषेधार्थ अजित नवलेंचे आंदोलन

अकोले तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी कोविड सेंटर व खासगी दवाखान्यांना तुटपुंज्या सुविधा मिळत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन, औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याच्या निषेधार्थ आज दुपारी अकोले तहसील कार्यालयावर माकपचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

Akole
Akole
author img

By

Published : Apr 18, 2021, 4:24 PM IST

अकोले : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी कोविड सेंटर व खासगी दवाखान्यांना तुटपुंज्या सुविधा मिळत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन, औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याच्या निषेधार्थ आज दुपारी अकोले तहसील कार्यालयावर माकपचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार डॉ किरण लहामटे यांनी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्याशी मोबाईलचा स्पीकर सुरू ठेऊन बोलणी केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आमदार लहामटे यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करत अकोलेवर होणाऱ्या अन्यायाची माहिती सर्वांसमोर मांडली. तर येत्या 2 दिवसांत यात सुधारणा केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आमदारांना दिले.

या आंदोलनात किरण लहामटे, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, माकप नेते डॉ. अजित नवले, मिनानाथ पांडे, बी.जे. देशमुख, भानुदास तिकांडे, महेशराव नवले, दादापाटील वाकचौरे, विनय सावंत, डॉ संदीप कडलग, बाळासाहेब वडजे, नितीन नाईकवाडी, डॉ अनिल वाघ, बाळासाहेब भोर, रमेश आरोटे, विलास आरोटे, ऍड. के. बी. हांडे, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते, डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल व्यवसायिक, लॅब संचालक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.