ETV Bharat / state

Ahmednagar will be renamed Ahilya Nagar : अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करणार - मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा - Ahmednagar will be renamed Ahilya Nagar

अहमदनगरचे नाव बदलून आता अहिल्यानगर ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ते नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

Ahmednagar
Ahmednagar
author img

By

Published : May 31, 2023, 5:48 PM IST

Updated : May 31, 2023, 5:54 PM IST

अहमदनगर - अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्या नगर करण्यात येईल, मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शिंदे-भाजप युती सरकारने आणखी काही शहरांची नावेही बदलली आहेत. गेल्या वर्षीच सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती. आता अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्या नगर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये राज्य विधान परिषदेत सांगितले की त्यांनी अहमदनगरचे नाव 18 व्या शतकातील माळव्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मागितला आहे. आता या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. गेल्यावर्षी सत्तेत आल्यानंतर शिंदे-भाजप युती सरकारने इतर काही शहरांची नावेही बदलली आहेत.

गेल्या वर्षीच सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर करण्याची मागणी करत होता. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगरच्या चौंडी गावात झाला होता. त्यांचा अहमदनगरचा संबंध होता. त्यामुळे या शहराचे नाव त्यांच्या नावावर ठेवावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अहमदनगर हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील मोठे नावजलेले शहर आहे.

जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ते 240 बी सी पासून काही प्रमुख राज्यांचा एक भाग आहे. अहमदनगर हे एकेकाळी निजामशाही म्हणूनही ओळखले जात होते. 1486 मध्ये, मलिक अहमद निजाम शाह बहमनी सल्तनतचे पंतप्रधान झाले. तसेच 1494 मध्ये त्यांनी एका शहराची स्थापना केली ज्याला त्यांनी स्वतःचे नाव अहमदनगर ठेवले. त्यावेळेपासून हे शहर अहमदनगर या नावाने ओळखले जाते.

Last Updated : May 31, 2023, 5:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.