अहमदनगर - नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक हा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर या शिक्षकांचे गैरकृत्य चव्हाट्यावर आले.
पीडित मुलीच्या पित्याची पोलिसांत तक्रार
याप्रकरणी एका पीडित मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात संतोष एकनाथ माघाडे (वय 35) या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी संतोष माघडे याला अटक केली आहे.
हेही वाचा - ऑनलाईन शिकवणी वर्गात अश्लील व्हिडीओ; शिक्षक विद्यार्थांना बसला धक्का!
शिकवणीच्या नावाखाली शाळेत बोलावले जायचे
संतोष माघाडे नगर तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी माघाडे हा शिकवणीच्या नावाखाली मुलींना शाळेत बोलावून घ्यायचा. एका मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून माघाडेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यां(पोक्सो)तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - रिक्षा चालकाच्या अश्लील वर्तनामुळे युवतीने धावत्या रिक्षातून मारली उडी
करायचा अश्लील चाळे
या प्रकरणी पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शिकवणीच्या नावाखाली मुलींना शाळेत बोलावून त्यांच्याकडून हात-पाय दाबून घेण्यास लावून मुलींशी आरोपी शिक्षक माघाडे अश्लील चाळे करायचा. मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर या गैरकृत्याचा प्रकार समोर आला आहे.