ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : ३१ मार्च पर्यंत कुछ 'करो ना' परिस्थिती; अहमदनगरमध्ये दिसतोय प्रभाव - corona effect ahmednagar

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने 31 मार्चपर्यंत शाळांना सुटी दिली आहे. तसेच अनेक परिक्षादेखील 31 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत कुछ 'करो ना' सारखी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना या सेवेशी संबंधित कर्मचारी वर्ग वगळता इतर जनतेने अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना इफेक्ट अहमदनगर
कोरोना इफेक्ट अहमदनगर
author img

By

Published : Mar 20, 2020, 5:10 PM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी विविध कायद्यांचा आधार घेत प्रशासन करत आहेत. त्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. एकीकडे संशयित, बाधित रुग्णांवर उपचार आणि देखरेख ठेवण्याची मोठी जबाबदारी असताना विषाणूंचा फैलाव होऊ नये, म्हणून जनतेला एकत्र येण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच लोकांनी आपल्या घराबाहेर पडूच नये, या ठाम भूमिकेवर प्रशासन काम करत आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव बघता ईटीव्ही भारतने घेतलेला अहमदनगरमधील आढावा.

अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना या सेवेशी संबंधित कर्मचारी वर्ग वगळता इतर जनतेने अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक दुकाने, हॉटेल्स, परमिट रूम, गार्डन, मंगल कार्यालये आदी बंद ठेवण्यात येत आहेत.

हेही वाचा - कोरोना कहर : जगभरात मृतांचा आकडा १० हजारांच्या पुढे; सुमारे अडीच लाख बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.