ETV Bharat / state

एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाचा घरात घुसून तरुणीवर गोळीबार - तरुण गोळीबार राहुरी अहमदनगर

तरुणाने चक्क तरुणीच्या घरी जाऊन तिच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली.

firing in one side love
एकतर्फी प्रेम प्रकरण गोळीबार (संग्रहित)
author img

By

Published : Sep 15, 2020, 3:41 PM IST

Updated : Sep 15, 2020, 3:59 PM IST

राहुरी (अहमदनगर) - एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात सदर तरुणी बचावली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना तालुक्यातील देवळाली प्रवरा गावात घडली.

एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाचा घरात घुसून तरुणीवर गोळीबार

देवळाली प्रवरा या गावात एकतर्फी प्रेमातून विक्रम रमेश मुसमाडे (वय 30) या तरुणाने गावातीलच तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला. स्वयंपाक गृहात सदर तरुणी काम करत असताना, विक्रम याने 'तू माझ्यावर प्रेम का करत नाही', अशी विचारणा केली. यावेळी तरुणीची लहान बहिण तिथे आली असता, विक्रमने तिलाही मारहाण करत कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्या तरुणीवर ठेवला. यावेळी तरुणीच्या आजीने विक्रम यास जोराचा धक्का दिल्याने कट्यातुन सुटलेली गोळी तरुणीच्या डोक्याला जवळून गेल्याने सुदैवाने बचावली. मात्र, तरुणाने स्वतःच्या डोक्याला कट्टा लावत स्वतः वर गोळी झाडून घेतली. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.

accused vikram musmade
आरोपी विक्रम रमेश मुसमाडे

यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तर फॉरेन्सिक लॅबचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी धाव देत पुढील तपासा सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Sep 15, 2020, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.