ETV Bharat / state

कोणाची होणार अहमदनगर महानगरपालिका? भाजपकडे उमेदवारच नाही, तर राष्ट्रवादीला महापौरपदाची आस

पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. त्यामुळे भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. परिणामी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र, महापौरपदासाठी पुढील वर्षांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही.

author img

By

Published : Nov 14, 2019, 12:29 PM IST

अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर - महापौर पदासाठी बुधवारी संपूर्ण राज्यात सोडत काढण्यात आली. अहमदनगर महानगरपालिकेत पुढील महापौर पदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी निघाले आहे. त्यामुळे अनुसुचित प्रवर्गातील महिला नगरसेविकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवारच नसल्याने भाजपच्या आशा मावळल्या आहेत.

कोणाची होणार अहमदनगर महानगरपालिका?
कोणाची होणार अहमदनगर महानगरपालिका?

मागच्या वेळी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. त्यामुळे भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. परिणामी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र, महापौरपदासाठी पुढील वर्षांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षांच्या काळासाठी महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत.

हेही वाचा - पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळवलेल्या भाजपला 18 जागांचा धनी असलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. चार जागांचे बळ असलेल्या बसपच्या हत्तीचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे एक आगळेवेगळे समीकरण तयार झाले. कमी जागा मिळूनही भाजपने महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे पटकावली.

हेही वाचा - नाशिकच्या माया सोनवणेच्या भेदक फिरकीने महाराष्ट्र क्रिकेट संघाचा विजय; तामिळनाडूवर केली मात

सध्या शिवसेना (24) व भाजप (14) एकत्र आल्यास युतीचे संख्याबळ 38 होते. मात्र, राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपच्या दृष्टीने अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस आघाडीसोबत भाजपने हातमिळवणी केल्यास सत्तेची गणिते जुळवता येतील. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील सत्ता समीकरणे कशी आणि कधी बदलतील हे सांगने कठीण झाले आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे येणारा काळच ठरवेल.

Intro:अहमदनगर- पुढील महापौरपद अनु.जाती महिले साठी.. भाजपकडे उमेदवारच नाही, राष्ट्रवादीला महापौरपदाची आस.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_amc_reservation_vis_7204297

अहमदनगर- पुढील महापौरपद अनु.जाती महिले साठी.. भाजपकडे उमेदवारच नाही, राष्ट्रवादीला महापौरपदाची आस.

अहमदनगर- अहमदनगर महानगरपालीकेचे पुढील महापौर पदाचे आरक्षण अनुसुचित जाती (महीला) निघाल्याने अनुसुचीत जाती (महीला) या आरक्षणात निवडुन आलेल्या महीला नगरसेविका आता कोणत्या पक्षात किती तसेच दावेदार कोण-कोण आहेत ते खालीलप्रमाणे..

रिता भाकरे (शिवसेना)
रोहीणी शेंडगे (शिवसेना)
शांता शिंदे (शिवसेना)
शिला चव्हाण (कॉंग्रेस)
रुपाली पगारे (राष्ट्रवादी)

-भाजपाकडे एकही अनुसुचीत जाति महीला नगरसेविका नाही

पक्षिय बलाबल-
शिवसेना - 3
राष्ट्रवादी -1
कॉंग्रेस - 1
भाजप - O

- पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्या वेळी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी असेल. मात्र, भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे या पदाचा उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी अडीच वर्षांच्या काळातील महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत.
राज्यभर गाजावाजा झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळविलेल्या भाजपला 18 जागांचा धनी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाची व श्रेष्ठींची ध्येयधोरणे बासनात गुंडाळून महापौरपदासाठी पाठिंबा दिला. चार जागांचे बळ असलेल्या बसपच्या हत्तीचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे तब्बल 24 जागा मिळवीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेची एक नगरसेविका गैरहजर राहून भाजपच्या तंबूत गेली. परिणामी, एक आगळेवेगळे "एकीकरण' होऊन भाजपने कमी जागा मिळूनही महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे पटकावली.
-केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडात शिवसेनेकडून झालेला त्रास व आगामी विधानसभा निवडणुकीतील गणित नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्या वेळी महायुतीचा धर्म सोडून भाजपनेही शिवसेनेची साथ सोडून "राष्ट्रवादी'चा पाठिंबा स्वीकारला होता. बहुमताचा 35 हा जादुई आकडा पूर्ण करण्यासाठी त्या वेळी बसपच्या चार जणांनी साथ केली.
-सध्या शिवसेना (24) व भाजप (14) एकत्र आल्यास युतीचे संख्याबळ 38 होते. मात्र, राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपच्या दृष्टीने अडचणीची ठरली. त्यात 30 वर्षांची युतीदेखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला साथ करण्याची शक्‍यताच नाही.

शिवसेनेला बाजूला ठेवून कॉंग्रेस आघाडीसोबत भाजपने हातमिळवणी केल्यास सत्तेची गणिते जुळवता येतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 23, भाजपचे 14 असे मिळून "जादुई' आकडा ओलांडता येतो. त्यात कॉंग्रेसचे अवघे पाचच नगरसेवक आहेत. मात्र, आता भाजपऐवजी शिवसेना राज्यात कॉंग्रेस आघाडीसोबत नवी महाशिवआघाडी करण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास नगरमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याचीच दाट शक्‍यता आहे. नगरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच टोकाचा संघर्ष आहे. हा संघर्ष मिटेल का? हा प्रश्‍न येणारा काळच सोडवेल.
भाजप व राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्यांना आणखी केवळ तीनच नगरसेवकांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी बसप, समाजवादी व एखाद्या अपक्षाची मदत घेतली, तरी सत्ता मिळवता येईल. अर्थात कोणाला सत्तेपासून बाजूला ठेवायचे, याचे आडाखे बांधण्यास सुरवात झाली आहे, हे मात्र नक्की.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पुढील महापौरपद अनु.जाती महिले साठी.. भाजपकडे उमेदवारच नाही, राष्ट्रवादीला महापौरपदाची आस.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.