मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ते म्हणाले. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अहमदनगर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या होत्या.
कारणे दाखवा नोटीस : यानंतर जिल्हाध्यक्षांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते. परंतु ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना २४ जानेवारी रोजीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली आहे.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम - 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसचे प्रदेश कार्यालय असलेल्या टिळक भवन या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी पार पडला. यावेळी सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुन्हा एकदा नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून लोकशाहीला मारक असे काम देशात सुरू असल्याचा पुनरुच्चार केला.
देशांमध्ये बेरोजगारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला संपवण्याचा काम भारतीय जनता पक्ष करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली मात्र या 75 वर्षात जे घडलं नाही ते या नऊ वर्षात घडलं. गेल्या नऊ वर्षात देशांमध्ये बेरोजगारी आर्थिक संकट भ्रष्टाचार शेतकऱ्यांचे प्रश्न असे, अनेक समस्या निर्माण झाल्या असल्यासही नाना पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा - chandrakant patil Reaction: उशिराच्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो - चंद्रकांत पाटलांची जयंत पाटलांवर टीका