ETV Bharat / state

अहमदनगर दक्षिणमध्ये राजकीय घडामोडींना वेग; गांधी-थोरातांच्या भूमिका आज होणार स्पष्ट - radhakrushna vikhe

अहमदनगरमध्ये आज राजकीय घडामोडीची उलथापालथ होण्याची शक्यता... भाजप खासदार गांधींनी बोलावली निष्ठावंतांची बैठक.... विखे विरोधक थोरातांनीही नगरमध्ये केले कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन...

गांधी-थोरातांच्या भूमिका आज होणार स्पष्ट
author img

By

Published : Mar 24, 2019, 10:31 AM IST

अहमदनगर - लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजचा दिवस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी राजकीय भूमिकावार ठरणार आहे. आज एकीकडे युती-आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून घटकपक्ष, नेते-कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे भाजप विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनीही निष्ठावंताचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खा. गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

गांधी-थोरातांच्या भूमिका आज होणार स्पष्ट

सुवेंद्र गांधी यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून सुवेंद्र हे निवडणुकीत उतरणार असे बोलले जात आहे. तसे झाल्यास सुजय-संग्रामनंतर अजून एक युवा चेहरा या निवडणुकीच्या मैदानात दिसू शकेल. मुख्य म्हणजे खा. गांधी आज नेमकी काय भूमिका घेतात याकडे युती आणि आघाडीचेही लक्ष असणार आहे.

युतीच्या वतीने भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहेत. सुजय विखेंना आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे चांगलेच नाराज झालेले आहेत. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांची प्रचंड नाराजी समोर येत आहे. पुत्रप्रेमापोटी त्यांनी डॉ. सुजयच्या प्रचारासाठी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला त्यांची अनुपस्थिती ही बरचकाही सांगून जाणारी आहे.

नगर दक्षिणेत आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, हे सांगणारे राधाकृष्ण विखे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिणचे तालुके पिंजून काढत आहेत. सुजय विखे यांना मदत होईल, अशा पूरक नेत्यांची ते भेटीगाठी घेत आहेत. सुजयला मदत व्हावी यासाठी ते एकप्रकारे मैदानात उतरल्याने आघाडीकडून त्याचे तीव्र पडसाद नक्कीच उमटणार आहेत. सध्या माध्यमांसमोर राधाकृष्ण विखे बोलण्यास टाळत असले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नाही. लवकरच त्यांची आघाडीला धक्का देणारी भूमिका स्पष्ट होऊ शकते.

बाळासाहेब थोरात आज नगरमध्ये -

विखे-थोरात द्वंद्व सध्या खूपच जोरात आहे. एका पक्षात असतानाही त्यांचे राजकीय वैर अनेकवेळा समोर आले आहे. त्यानंतर डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर थोरतांनी राधाकृष्ण विखेंवर थेट हल्ला केला होता. त्याला विखेंनीही कडवट शब्दात उत्तर दिले आहे. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांनीही नगर दक्षिणेत कंबर कसली आहे. आज त्यांच्या उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाने करण ससाणे यांची जिल्हाध्यपदी निवड करून विखेंना अजून एक धक्का दिला आहे. थोरतांचे दक्षिणेत श्रीगोंदा, पाथर्डी, नगरमध्ये स्वतःचे जाळे असून नातेसंबंधांचा वापर करत विखेंविराधात ते उट्टे काढणार हे निश्चित आहे. एकूणच आज नगर शहरात राजकीय घमासान होणार असून आघाडी-युतीकडून आपापले किल्ले मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी केली जाणार आहे.

Intro:अहमदनगर- आजचा रविवार ठरणार नगर दक्षिणेत राजकीय भूमीकावार..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- आजचा रविवार ठरणार नगर दक्षिणेत राजकीय भूमीकावार..

अहमदनगर- आज रविवार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी आपापली राजकीय भूमिकावार ठरणार आहे. आज एकीकडे युती-आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून घटकपक्ष, नेते-कार्यकर्त्यांचा समनव्य साधण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे भाजप विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनीही निष्ठावाणांनाचा एक मेळावा आयोजित केला असून त्यात खा.गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. सुवेंद्र गांधी यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून सुवेंद्र हे निवडनुकित उतरणार असे बोलले जात आहे. तसे झाल्याससुजय-संग्राम नंतर अजून एक युवा चेहरा या निवडणुकीच्या मैदानात दिसू शकेल. मुख्य म्हणजे खा.गांधी आज नेमकी काय भूमिका घेतात याकडे युती आणि आघाडीचेही लक्ष असणार आहे.
युतीच्या वतीने भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची समनव्य बैठक बोलावण्यात आली असून त्यात प्रचारराची रणनीती ठरवण्यात येणार आहेत. सुजय विखेंना आघाडी कडून उमेदवारी न मिळाल्याने विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे चांगलेच नाराज झालेले आहेत. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांची प्रचंड नाराजी समोर येत असून पुत्रप्रेमापोटी त्यांनी डॉ सुजयच्या प्रचारासाठी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काल मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला त्यांची अनुपस्थिती बरचकाही सांगून जाणारी आहे. नगर दक्षिणेत आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही हे सांगणारे राधाकृष्ण विखे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिणचे तालुके पिंजून काढत असून सुजय विखे यांना मदत होईल अशा पूरक नेत्यांची भेट घेत आहेत. सुजयला मदत व्हावी यासाठी ते एकप्रकारे मैदानात उतरले असल्याने आघाडीकडून त्याचे तीव्र पडसाद नक्कीच उमटणार आहेत. सध्या माध्यमांसमोर राधाकृष्ण विखे बोलण्यास टाळत असले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नसून लवकरच त्यांची आघाडीला धक्का देणारी भूमिका स्पष्ट होऊ शकते.

बाळासाहेब थोरात आज नगर मध्ये..
-विखें-थोरात द्वंद्व सध्या खूपच जोर्यात आहे. एका पक्षात असतानाही त्यांचे राजकीय वैर अनेकवेळा समोर आले असले तरी डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर थोरतांनी राधाकृष्ण विखेंवर थेट हल्ला केला आहे आणि त्याला विखेंनीही कडवट शब्दात उत्तर दिले आहे. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांनीही नगर दक्षिणेत कंबर कसली असून आज त्यांच्या उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाने करण ससाणे यांची जिल्हाध्यपदी निवड करून विखेंना अजून एक धक्का दिला आहे. थोरतांचे दक्षिणेत श्रीगोंदा, पाथर्डी, नगर मध्ये स्वतःचे जाळे असून नातेसंबंधांचा वापर करत विखेंविराधात ते उट्टे काढणार हे निश्चित आहे.
एकूणच आज नगर शहरात राजकीय घमासान होणार असून आघाडी-युती कडून आपापले किल्ले मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी केली जाणार आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- आजचा रविवार ठरणार नगर दक्षिणेत राजकीय भूमीकावार..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.