ETV Bharat / state

रुग्णांसाठी डॉक्टर, नर्स झाले आचारी, रुग्णसेवेसोबतच जेवणाची पण होतेय इथे व्यवस्था..

author img

By

Published : Mar 28, 2020, 9:19 PM IST

सध्या कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जगच लॉकडाऊन होऊन हादरले आहे. अशा परिस्थितीत रुग्णसेवेसह अनेकांना 2 वेळेच्या जेवणाची चिंता पडलेली दिसून येत आहे. मात्र, इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये येतोय.

ahemdnagar
रुग्णसेवेसोबतच जेवणाची पण होतेय इथे व्यवस्था..

अहमदनगर - सध्या कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जगच लॉकडाऊन होऊन हादरले आहे. अशा परिस्थितीत रुग्णसेवेसह अनेकांना 2 वेळेच्या जेवणाची चिंता पडलेली दिसून येत आहे. मात्र, इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये येतोय.

अस्थीरोग तज्ज्ञ असलेले डॉ. महेश वीर यांच्या हॉस्पिटलमध्ये केवळ नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर बाजूच्या बीड जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक असतात. लॉकडाऊनमुळे या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाइकांच्या समोर जेवणाची अडचण समोर उभी राहिली आहे. हॉटेल, खानावळी बंद असल्याने करायचं काय या चिंतेत असताना हॉस्पिटल व्यवस्थापनाने रुग्णसेवेबरोबरच मानवतेचा दृष्टिकोन ठेवत सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलचे सर्व महिला डॉक्टर, नर्सेस यांच्यासह हॉस्पिटलमधील कामावर असलेली इतर पुरुष वर्ग त्यांना मदतीसाठी पुढे आले आहेत. रुग्णालयातच सकस आणि पौष्टिक जेवण रुग्णांना आणि नातेवाईकांना उपलब्ध झाले आहे.

या परिसरात इतरही हॉस्पिटल आहेत. तेथील रुग्णांनासुद्धा या हॉस्पिटलमधून जेवण पुरवले जात आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असून, सध्या रुग्णसेवा जेवढी महत्त्वाची आहे. तेवढेच भुकेल्यांना अन्न मिळणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असलेल्या हॉस्पिटलच्या सर्व व्यवस्थापनाने डॉक्टरांनी सांगितले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.