अहमदनगर - शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी विद्यापीठं अथवा शहराकडे धाव घ्यावी लागते. बळीराजाची ही गरज ओळखून त्याला त्याच्याच तालुक्याच्या ठिकाणी माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पारनेर येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही कपात; जाणून घ्या, आजचे दर
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा नेहमीच दुष्काळी भाग राहिला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळावी, शेती साहित्य कमी किंमतीत मिळावे. यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यासाठी प्रदर्शनातून त्याची ओळख होण्यास मद्दत होईल, असे मत आमदार निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी एक लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात जाऊन प्रदर्शन पहाणे शक्य होत नाही. या प्रदर्शनात ना नफा, ना तोटा या तत्वावर अनेक शेती राहित्य उपलब्ध आहेत.