ETV Bharat / state

रखडलेल्या निळवंडे धरणाचे काम त्वरीत सुरू करा, तळेगावात रास्ता रोको - तळेगाव

जिल्ह्यातील सतत दुष्काळ सोसणाऱया 182 गावांसाठी वर्ष 1970 मध्ये निळवंडे धरणाचे काम सुरू झाले. कासवगतीने सुरू असलेल्या या धरणाच्या राजकारणावर अनेक नेते प्रस्थापित झाले. मात्र, अजुनही धरणाचे काम काही केल्या पुर्ण झाले नाही.

रखडलेल्या निळवंडे धरणाचे काम त्वरीत सुरू करा, तळेगावात रास्ता रोको
author img

By

Published : May 27, 2019, 1:40 PM IST

शिर्डी - गेल्या 47 वर्षापासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी निधी मिळूनही काम रखडले आहे. कालव्याचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी आज (सोमवार) निळवंडे कृती समितीने संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रखडलेल्या निळवंडे धरणाचे काम त्वरीत सुरू करा, तळेगावात रास्ता रोको

अहमदनगर जिल्ह्यातील सतत दुष्काळ सोसणाऱया 182 गावांसाठी वर्ष 1970 मध्ये निळवंडे धरणाचे काम सुरू झाले. कासवगतीने सुरू असलेल्या या धरणाच्या राजकारणावर अनेक नेते प्रस्थापित झाले. मात्र, अजुनही धरणाचे काम काही केल्या पुर्ण झाले नाही. सहा महिन्यापुर्वी केंद्राकडून आणी राज्य सरकारकडून कालव्यांसाठी निधी मंजूर झाला होता. निवडणूक तोंडावर येताच सरकारने ढांगाढोंगात रखडलेल्या कालव्याचे कामही सुरू केले, मात्र अकोले तालुक्यातील सरकारने संपादित केलेल्या जमिनीवर उघडे कालवे होवू देणार नाही, ही भुमिका घेत राष्टवादीचे आमदार वैभव पिचड यांनी काम बंद पाडले.

निवडणूक असल्याने हा मुद्दा काही काळ बाजूला पडला होता. मात्र, आता निळवंडे कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे. रखडलेल्या कालव्याचे काम पुन्हा सुरू करावे, कालव्याच्या कामाला विरोध करणाऱयांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी कोपरगाव - संगमनेर मार्गावरील तळेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.

या आंदोलनात 182 गावातील लाभकारक शेतकरी सहभागी झाले होते. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही, अशी भुमिका घेत आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. यावर प्रशासन काय ठोस भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गेल्या 47 वर्षापासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी निधी मिळूनही काम रखडले आहे..कालव्याचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी आज निळवंडे कृती समीतीने संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे रास्तारोको केलाय....

VO_ अहमदनगर जिल्ह्यातील सतत दुष्काळ सोसणा-या 182 गावासाठी 1970 साली निळवंडे धरणाचे काम सुरू झाले..कासव गतीने सुरू असलेल्या या निळवंडे धरणाच्या राजकारणावर अनेक नेते प्रस्थापित झाले मात्र अजूनही धरणाचे काम काही केल्या पुर्ण झाले नाही..सहा महिन्यापुर्वी केंद्राकडून आणी राज्यसरकारकडून कालव्यांसाठी निधी मंजूर झाला..निवडणूका तोंडावर येताच सरकारने ढांगाढोंगात रखडलेल्या कालव्याचे कामही सुरू केले मात्र अकोले तालुक्यातील सरकारने संपादित केलेल्या जमिनीवर उघडे कालवे होवू देणार नाही हि भुमिका घेत राष्टवादीचे आमदार वैभव पिचड यांनी काम बंद पाडलेय..निवडणूका असल्याने हा मुद्दा काही काळ बाजूला पडला होता मात्र आता निळवंडे कृती समीती पुन्हा आक्रमक झाली आहे.. रखडलेल्या कालव्याचे काम पुन्हा सुरू करावे , कालव्याच्या कामाला विरोध करणारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी कोपरगाव संगमनेर मार्ग तळेगाव येथे अडवण्यात आला .. या आंदोलनात 182 गावातील लाभकारक शेतकरी सहभागी झाले आहेत..जोवर ठोस निर्णय होत नाही तोवर रस्ता सोडणार नाही अशी भुमिका घेत आंदोलकांनी रस्ता अडवल्याने हे आंदोलन किती वेळ सुरू राहणार? प्रशासन काय ठोस भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे...Body:MH_AHM_Shirdi Water Farmer Andolan_27 May_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Water Farmer Andolan_27 May_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.