ETV Bharat / state

नगरमधील बायपास रोड बनलेत मृत्युचे सापळे; विविध मागण्यांसाठी संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको

अनेकदा गावातील ग्रामस्थांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज करूनही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना होत नसल्याचा निषेध म्हणून आज (मंगळवार) नेप्ती, निंबळक, निमगाव वाघा, चास येथील ग्रामस्थांनी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता रोको आंदोलन
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:45 PM IST

अहमदनगर - नगर शहरातून जाणारे विविध बायपास रस्त्यावरील चौक हे मृत्युचे सापळे झाले आहेत. दिशादर्शक फलक नसल्याने तसेच गतिरोधक नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात आत्तापर्यंत झाले आहेत. यात अनेकांचे प्राण तर, अनेकजण अपंगही झाले आहेत. याची सर्वात जास्त झळ या बायपास रोड चौकाच्या नजीक असलेल्या विविध गावातील ग्रामस्थांना बसत आहे. त्यांचा वावर या ठिकाणाहून दिवस-रात्र होत असतो. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

नगरमधील बायपास रोड बनलेत मृत्यूचे सापळे

अनेकदा गावातील ग्रामस्थांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज करूनही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना होत नसल्याचा निषेध म्हणून आज (मंगळवार) नेप्ती, निंबळक, निमगाव वाघा, चास येथील ग्रामस्थांनी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी गतिरोधक आणि मार्गदर्शक फलक बसवण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

यानंतर प्रशासनाच्यावतीने आंदोलकांना लवकरच गतिरोधक बसवले जातील, तसेच मार्गदर्शक फलक लावले जातील आणि विविध उपाययोजना या चौकांमध्ये केल्या जातील, याचे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज इंडियन कॉलेजची विद्यार्थिनी गेल्या आठवड्यातच या ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडली होती. तसेच जवळपास पंधरा विद्यार्थी आत्तापर्यंत या ठिकाणी अपघातामध्ये जखमी झालेले आहेत.

Intro:अहमदनगर- बायपास रोड झाले मृत्यूचे सापळे. संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_bypaas_road_protest_pkg_7204297

अहमदनगर- बायपास रोड झाले मृत्यूचे सापळे. संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको.

अहमदनगर- नगर शहरातून जाणारे विविध बायपास रस्त्यावरील चौक हे मृत्यूचे सापळे झाले असून दिशादर्शक फलक नसल्याने तसेच गतिरोधक नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात आत्तापर्यंत झालेले असून अनेकांचे प्राण त्यात गेले आहे तर अनेक जण अपंग झाले आहेत. या सर्वांची जास्त झळ या बायपास रोड चौका नजीकच्या असलेल्या विविध गावांतील ग्रामस्थांना बसत असून त्यांचा वावर या ठिकाणाहून दिवस-रात्र असल्याने अनेकदा अपघात या गावातील ग्रामस्थांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहेत. प्रशासनाला अनेकदा विनंती अर्ज करूनही अपघात टाळण्यासाठी च्या उपाययोजना होत नसल्याचा निषेध म्हणून आज मंगळवारी नेप्ती, निंबळक, निमगाव वाघा, चास येथील ग्रामस्थांनी नेप्ती बाईपास चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी गतिरोधक आणि मार्गदर्शक फलक बसवण्याचा लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे यावेळी आंदोलकांनी सांगितलं. यानंतर प्रशासनाच्यावतीने आंदोलकांना लवकरच गतिरोधक बसवले जातील तसेच मार्गदर्शक फलक लावले जातील आणि विविध सुविधा उपाय योजना या चौकांमध्ये केल्या जातील याचे आश्वासन देण्यात आलं. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज इंडियन कॉलेजची विद्यार्थिनी गेल्या आठवड्यातच या ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्युमुखी झाली होती तसेच जवळपास पंधरा विद्यार्थी आत्तापर्यंत या ठिकाणी अपघातामध्ये जखमी झालेले आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगरConclusion:अहमदनगर- बायपास रोड झाले मृत्यूचे सापळे. संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.