ETV Bharat / state

Raveena Tandon in Shirdi : अभिनेत्री रवीना टंडन साईंच्या चरणी; सहकुटुंब घेतले दर्शन - अभिनेत्री रवीना टंडन शिर्डी

शिर्डीत साईबाबांना मी कधीच काही मागत नाही, साईबाबा न मागताच मला सर्व काही देतात, अशा भावना अभिनेत्री रवीना टंडनने व्यक्त केल्या आहेत. त्या आज शिर्डीत साईबांबाच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने रवीना टंडन यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला.

Raveena Tandon
अभिनेत्री रवीना टंडन
author img

By

Published : Jan 17, 2023, 7:51 PM IST

अभिनेत्री रवीना टंडन माध्यमांसोबत बोलताना

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी साईबाबा माझाकडून काही घेवुन गेले आणि त्यांनी काही दिले पण अशा भावना अभिनेत्री रविना टंडनने शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाले की, मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात माझा वडिलांचे निधन झाले आणि आज शिर्डी साईबाबांना विचारण्यासाठी आले होते की माझे वडील तुमच्या सोबत आहे ना. आज शिर्डी साईबाबांनाच्या माध्यान आरतीला उपस्थित राहता आल्याने मनला खूप समाधान मिळाले असल्याचे यावेळी अभिनेत्री रविना टंडन यांनी सांगितले.

रवीना टंडन साईंच्या दरबारी : शिर्डी साईबाबांना मी कधीच काही मागत नाही तर साईबाबा न मागताच मला सगळे देत असतात. यामुळे मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आज शिर्डीला आली असल्याचे अभिनेत्री रविना टंडन म्हणाल्या. मी लहानपणापासून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. माझी मुलगी 12 वीत शिकत आहे. तिचे पेपर सुरू होणार असल्याने ती शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येवु शकली नाही. मी तिच्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचेही रविना यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

साईसंस्थानकडून शाल देऊन सन्मान: प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तसेच शिर्डी साईबाबांची निस्सीम भक्त रविना टंडन आज दुपारी शिर्डीत येवून साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या आरतीनंतर रविनाने साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने रविनाचा शॉल देवून सन्मान करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनानंतर रविना मंदिर परिसरात आली त्यावेळी तिला काही कुत्रे दिसले त्यानंतर त्यांनी आपल्या हाताने कुत्र्यांना बिस्किटही खाऊ घातले.

सोशल मिडीयावर सक्रिय : सोशल मीडियावर फनी व्हिडिओ टाकायला मला आवडतात. मीही कधी कधी असे व्हिडीओ टाकत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी शेजारची बाई पळून गेली आहे, तुम्ही कुठे आहे म्हणून असे व्हिडीओ मी सोशल मीडियावर टाकला होता, त्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र आम्ही कलाकार आहोत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

हेही वाचा : Ankita Lokhande's Romantic Sankranti : सैराटच्या गाण्यावर नऊवारी साडीतील अंकिता लोखंडेचा रोमँटिक संक्रात पिंगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.