ETV Bharat / state

सहकार क्षेत्राची वाट लावणाऱ्या राजकीय टोळीला ईडीने धडा शिकवावा -अण्णा हजारे

जरांडेश्वर साखर कारखान्यासह इतर ज्या कारखान्यांच्या विक्रिबाबत गैरव्यव्हार झाले आहेत, त्या सर्व कारखान्यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी होणे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पक्ष, सत्ता हे काय आज आहे उद्या नाही. मात्र, सहकार चळवळ मोडीत काढणे हा खूप मोठा धोका आहे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
author img

By

Published : Jul 3, 2021, 3:52 PM IST

Updated : Jul 3, 2021, 8:06 PM IST

अहमदनगर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पवार यांचे संबंध महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. आता सक्त वसुली संचालनालयाने अर्थात ईडने सातारा येथील जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारवाई सुरू केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. यासंदर्भात ईडीने अजित पवार यांचाही एका पत्रात उल्लेख केला आहे. यावरून हजारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यात गैरव्यवहार झालेल्या ४९ सहकारी साखर कारखान्यांची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, ज्या साखर कारखान्यांच्या विक्रिबाबत गैरव्यव्हार झाले आहेत त्या सर्व कारखान्यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी होणे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पक्ष, सत्ता हे काय आज आहे उद्या नाही. मात्र, सहकार चळवळ मोडीत काढणे हा खूप मोठा धोका आहे, असे मतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

जरांडेश्वर साखर कारखान्यासह इतर ज्या कारखान्यांच्या विक्रिबाबत गैरव्यव्हार झाले आहेत त्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'चार हजार पानांची तक्रार दाखल केली होती'

जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना व गुरुकमोडिया कंपनी यांचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे यापूर्वीच आले होते. ती कागदपत्रे आम्ही उच्च न्यायालयात दाखल केले आहेत. मात्र, न्यायालयाने सांगितले की तुमची तक्रार दाखल झाली पाहिजे. त्यांनतर आम्ही मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चार हजार पानांची तक्रार दाखल केली होती. कारखान्याची तक्रार नोंदवल्यानंतर सरकारने मात्र, चौकशी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील माणसाला नियुक्त केले व त्यांनी या प्रकरणात काही तथ्य नाही, असा अहवाल सरकारला दिला.असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला आहे.

'जरांडेश्वर कारखान्याप्रमाणेच 49 कारखान्यांत गैरव्यवहार'

आम्ही आता सत्र न्यायालयात गेलो. तेथे ही केस अजून बाकी आहे. आता एक चांगली गोष्ट झाली, या प्रकरणाची चौकशी ईडीने सुरू केली आहे. आता ईडीने फक्त जरांडेश्वर कारखान्याची नाही, तर उरलेल्या 48 साखर कारखान्यांचीही चौकशी करावी. सर्व कारखान्यात अशाच प्रकारचे गैरव्यवहार झाले आहेत. त्याचे गबाळ चौकशीनंतर बाहेर पडेल. त्यांचीही चौकशी ईडीने करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे. दरम्यान, यातील बहुतांश लोकांनी संगनमताने ४९ कारखाने कवडीमोल भावाने विकले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे जमा करून चौकशी समितीसमोर ठेवलेली आहेत. संगमताने सर्व कारखाने कुणाला कोणता कारखाना द्यायचा, असे सर्व नियोजन करून विकण्यात आले आहेत. आता आमची विनंती एकच आहे. ईडीने या सर्व ४८ कारखान्याची चौकशी करावी. आम्हाला कुठल्याही पक्ष व पार्टीचे घेणे देणे नाही. पण महाराष्ट्र राज्य असे राज्य आहे, की ज्या राज्यात सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात भरभराटीस आले होते. त्या सहकार खात्याचे मार्गदर्शन देशाला मिळाले होते. त्यातूनच ही सर्व सहकारी कारखान्यची चळवळ वाढली होती. त्यातूनच हे ४९ कारखाने उभे राहिले होते, असेही हजारे यांनी सांगितले.

'राज्याची सहकार क्षेत्राची मोठी परंपरा मोडीत काढू नका'

धनंजय गाडगीळ, वैकुंठ भाई मेहता, विठ्ठलराव विखे यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविण्यासाठी मोठे काम केले आहे. आपल्या राज्यातील सहकार चळवळीचे अनुकरण करत इतर राज्यांनी त्याचा आदर्श घेतला. मात्र, आज आपल्याच राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरु आहे. याचे मला दुःख वाटते अशी खंतही अण्णांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात काही लोक ही सहकार चळवळ मोडीत काढून खासगीकरण करण्याच्या मागे लागले आहेत. मात्र, राज्याला हा खूप मोठा धोका आहे. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यात ईडीने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण बाहेर पडेल.

'घोटाळा झाला नाही, मग संचालक मंडळ बरखास्त का केले?'

महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेची चौकशी एक-दोन वेळा नाही, तर तेरा ते चौदा वेळा झाली आहे. बँकेच्या ८८ संचालकांकडून वसुली निश्चित केली. पण सत्ता हातात असल्यावर काय होते, ते आपण पहात आहात. या संचालक मंडळाच्या विरोधात आमच्या सारखे लोक हाय कोर्टात, सत्र न्यायालयात गेले. तेव्हा हे संचालक मंडळ बरखास्त झाले. आम्ही जे दाखल केले त्यात काही तथ्य नाही, मग संचालक मंडळ का बरखास्त झाले असा सवालही हजारे यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : Jul 3, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.