अहमदनगर - कोरोनाग्रस्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वास्थ्यासाठी भिंगार येथे रोकडेश्वर मंदिरात महापूजा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना कोराणाची लागण झाल्यामुळे व्यथित झालेल्या नगर जिल्ह्यातील भिंगार शहर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील रोकडेश्वर मंदिरांमध्ये एक अभिषेक पूजा करून त्यांच्या स्वास्थ्यासाठी अभिषेक करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणीस यांनी सध्या कोरनाच्या काळामध्ये अविरत राज्यभर दौरे केले, कुठेही कोरनाची भीती न बाळगता त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि राज्य सरकारला धारेवर धरले. पूरग्रस्त परिस्थितीमध्येही त्यांनी अनेक ठिकाणी दौरे करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाचे संकट सध्या कुठे कमी होत असताना त्यांनाही या विषाणूची बाधा झाली असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, नक्कीच ते यातून लवकर बरे होऊन पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या सेवेसाठी दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने फडणीस यांच्या स्वास्थ्यासाठी तसेच लवकर कोरोनातून बरे होण्यासाठी या अभिषेक पूजेचे आयोजन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. भिंगार शहर भाजपचे उपाध्यक्ष संतोष हजारे,राजु दहिहंडे, युवा भाजप अध्यक्ष किशोर कटोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत