ETV Bharat / state

Aaditya Thackeray : 'तुमच्या कपाळावर गद्दार लिहलयं, ते आता...'; आदित्य ठाकरेंचे बंडखोरांवर टीकेचे बाण सुरुच - आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा

बंडखोर आमदारांना सगळ काही दिलं आहे. त्यापेक्षाही जास्त दिलं ही आमची चुक होती. त्यांना जास्ती दिलं त्याचं त्यांना अपचण झालं. याला आम्ही कारणीभूत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली ( aaditya thackeray attacks shivsena rebel mla ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
author img

By

Published : Jul 23, 2022, 10:46 PM IST

Updated : Jul 24, 2022, 6:22 AM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार व्हाव लागलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. त्यात आता शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटातील बंडखोर आमदारांवार निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांना सगळ काही दिलं आहे. त्यापेक्षाही जास्त दिलं ही आमची चुक होती. त्यांना जास्ती दिलं त्याचं त्यांना अपचण झालं. याला आम्ही कारणीभूत आहे, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं ( aaditya thackeray attacks shivsena rebel mla ) आहे.

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेद्वारे शिर्डीत आले होते. त्याचा समारोप करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरेंनी साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच, साईंच्या चरणी जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. देवाने आतापर्यंत जे दिलं. त्याचाच विचार मी प्रत्येक मंदिरात गेल्यावर करतो. देवाच्या समोर आल्यावर अन्य काही विचार करत नाही, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

'गद्दारी करुन गेलात तरीही...' - दरम्यान, साई मंदिरात जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. 'तुमच्या कपाळावर आता गद्दार लिहलं गेलं आहे. ते आता पुसल जाणार नाही. गद्दारी करुन गेलात तरीही ज्यांच्यासाठी आपण काम केल मेहनत घेतली सगळ काही केलं, तरी यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचं दु:ख होत आहे. त्याच्याबद्दल राग नाही पन दु:ख आहे,' असं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.

'राज्य सरकार कोसळणार' - त्यांनी ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरे व शिवसेनेविरोधात केलेली नाही. तर महाराष्ट्र व माणूसकी विरोधात गद्दारी केली आहे. लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार आहे. लवकरच हे राज्य सरकार कोसळणार आहे. मतदान करताना हे लक्षात ठेवा की मत तुम्ही कोणाला देणार आहात?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

'राजकारण एवढे घाणेरडे झाले आहे की...' - उद्धव ठाकरे हे मनक्याचे ऑपरेशन होऊनही आठवड्याभरात कामाला लागले. कोविडचे रुग्ण वाढू नयेत म्हणून बैठका घेत होते. त्यावेळी 40 गद्दार व त्यांचे नेते जमवा जमव करत होते. कोण आमदार सोबत येतो. कोण मंत्री सोबत येतो. आत्ता सुद्धा त्यांचे तेच कार्य सुरू आहे. हे तुम्हाला पटते का? हे तुमचे शासनकर्ते होऊ शकतात का?. राजकारण एवढे घाणेरडे झाले आहे की मी तरुणांना राजकारणात या हे कसे सांगू, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Anant Geete : '‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा'; अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

Last Updated : Jul 24, 2022, 6:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.