अहमदनगर - शहरातील तारकपूर भागात राहणाऱ्या निरंजन नाईक या व्यक्तीने आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच अचानकपणे अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यात निरंजन नाईक हा 40 टक्के भाजला आहे.
निरंजन याने आपल्या पत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे, या तक्रारीची दखल पोलीस घेत नसल्याने त्याने चिडून पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समजते.
पेटलेल्या निरंजनला यावेळी परिसरात असलेल्या पोलिसांनी तातडीने विझवले आणि रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - ...तर कोरेगाव-भीमा प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करेल - गृहमंत्री
हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान