अहमदनगर - शिर्डी जवळील खंडोबाची वाकडी (ता. कर्जत) येथे आज (गुरुवार) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा (सिलिंडर) स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक आहे. या आगीमुळे शेजारील घरांचे देखील नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे, हौशिराम तुकाराम पगारे (चितळी रोड, शिरगिरे आखाडा, वाकडी) यांच्या पत्नीने सायंकाळी 7 च्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटविला त्यावेळी रेग्युलेटरमधून आग निघून गॅसने पेट घेतला. गॅसच्या टाकीने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्या आरडाओरडा करू लागल्या. घरात असलेल्या 5 शेळ्या घराबाहेर घेतल्या त्यानंतर घरातील इतर संसारोपयोगी वस्तू बाहेर घेण्याचा प्रयत्न करत असताना शेजारील लोकांनी गॅसचा भडका पाहुन त्यांना घरापासून दूर नेले. काही मिनिटांत भडका झालेल्या गॅसच्या टाकीचा भीषण स्फोट होऊन मोठा आगडोंब तयार झाला. पगारे यांच्या घराने पेट घेतला. गॅस टाकीचा स्फोट इतका भयानक होता की दूरपर्यंत परिसरात तीव्रता जाणवली. हा स्फोट होताच शेजारील लोकांमध्येही घबराट पसरली. या घटनेनंतर येथील कैलास लहारे यांनी गणेश कारखाना येथे संपर्क साधत अग्निशामक दलाची गाडी बोलावली. अग्निशमन गाडीने आग विझवली. मात्र, तोपर्यंत पगारे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले होते. ही आग इतकी भयानक होती की शेजारील चार घरांना सुद्धा नुकसान झाले. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल
हौशिराम पगारे हे मोलमजुरी करुण पत्नीसह या घरात राहत होते. उदारनिर्वाहला आधार म्हणून मोलमजुरी बरोबर त्यांनी 5 शेळ्यांचे पालन करत होते. या गॅस टाकीच्या स्फोटमध्ये संपूर्ण संसार जळून खाक झाला असला तरी त्यांनी मुक्या जनावरांना प्राधान्याने घराबाहेर घेऊन वाचविले.
हौशिराम पगारे राहत असलेल्या परिसरात 15 आदिवासी कुटुंब पाटबंधारे विभागच्या सुमारे सव्वा एकर जागेत राहत आहेत. या स्फोटामुळे त्यांच्या घरातील मजुरी करुन साठविलेली काही रक्कम, धान्य, कपडे, भांडे व एक दुचाकी संपूर्ण जळून खाक झाले आहे.
हेही वाचा - अहमदनगर : राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचितकडून मैदानात