ETV Bharat / state

कलयुगातील श्रावणबाळ.. 71 वर्षीय मुलाने 105 वर्षीय आईला खांद्यावर बसवून घडवले साईदर्शन - श्रावणबाळ शिर्डी

कोपरगाव येथील रिक्षाचालकाने ( son carried mother on shoulder to shirdi ) त्याच्या आईला खांद्यावर बसवून साई दर्शनाला नेल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. बबनराव जोगदंड असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

Baban Jogdand mother shirdi travel
बबन जोगदंड आई शिर्डी प्रवास
author img

By

Published : Apr 17, 2022, 2:37 PM IST

Updated : Apr 18, 2022, 6:59 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोपरगाव येथील रिक्षाचालकाने ( son carried mother on shoulder to shirdi ) त्याच्या आईला खांद्यावर बसवून साई दर्शनाला नेल्याची घटना समोर आली आहे. बबनराव जोगदंड असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, बबनराव हे स्वत 71 वर्षांचे असून वयोवृद्ध असताना देखील त्यांनी आपल्या 105 वर्षीय आईला ( Jayabai jogdand travel shirdi ) साई दर्शनाला नेले. आईच्या प्रेमापोटी त्यांनी हे केले असून, त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

माहिती देताना बबनराव जोगदंड

हेही वाचा - Ahmednagar Crime News : निर्दयी! पतीने केली पत्नी आणि मुलाची हत्या; मेहुण्याला व्हिडीओ कॉल करून म्हणाला...

श्रीरामनवमी निमित्ताने कोपरगावातून हजारो साईभक्त शिर्डीला पाई जातात. कोपरगाव येथील 71 वर्षीय रिक्षाचालक बबन तुळशीराम जोगदंड यांनी त्यांच्या 105 वर्षांच्या आई जयाबाई यांना खांद्यावर घेत कोपरगाव ते शिर्डी अशी 18 किलोमीटरची पाई यात्रा घडवली. बबनराव यांनी आईच्या प्रेमापोटी केलेल्या या कृतीची सर्वत्र चर्चा आहे. कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात सर्वसामान्य परिस्थितीत रिक्षाचालक बबनराव जोगदंड राहतात. घरची परिस्थिती अतिशय बेताची. त्यांच्या पत्नी सुमनबाई भाजीपाला विकून संसाराला हातभार लावतात. बबनराव जोगदंड हे माळकरी आणि यांनी या आधी 18 वेळा पंढरपूरची पाई वारीही केली आहे.

आईला पाई घेवून जाण्याचा विचार कसा आला - अनेक वर्षांपासून कोपरगाव येथील मुंबादेवीच्या साईगाव पालखी श्रीरामनवमीला पाई शिर्डीला जात असतो. या पालखीत एकदा तरी आईला घेवून जावे, असा विचार दरवर्षी यायचा. कोपरगाव शहरातील बिरोबा चौकात मृत्युंजय गणेश आणि मुंजोबा मंदिर आहे. येथे बबनराव जोगदंड नित्य दर्शनासाठी येतात. याच मंदिरात दक्षिणमुखी असलेली पंचधातुची पर्वत उचललेली मूर्ती आहे. नेहमीप्रमाणे रामनवमीला सकाळी दर्शनासाठी आलो. बजरंगबलीने एका हातात पर्वत उचललेला पाहून मूर्तीकडे पहात "तुम्ही डोंगर घेवून जावू शकता मग मी आईला शिर्डीला साई दर्शनासाठी खांद्यावर जावू शकत नाही का "असे म्हणून नमस्कार करताच तेवढ्यात फुल डोक्यावर पडले. मग अंगात बारा हत्तीचे बळ संचारल्यासारखे वाटून आईला शिर्डीला घेऊन जायचेच, असा निर्धार करून पुर्णत्वास नेला, असे बबनराव जोगदंड सांगतात.

आईमुळे माझे कौतुक - कोपरगावहून शिर्डीला आईला खांद्यावर घेऊन पाई जाणारे बबनराव जोगदंड आणि त्यांची आई जयाबाई यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जोगदंड परिवाराची अनेकांनी भेट घेत त्यांचा सन्मान केला आहे.

हेही वाचा - Saibaba Donation Counting: तीन दिवसात साईबाबांना तब्बल 4 कोटीचे दान.. 3 लाख भाविकांनी घेतले साई दर्शन

Last Updated : Apr 18, 2022, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.