ETV Bharat / state

संगमनेरमधील नव्वदीतील आजी-आजोबांची कोरोनावर मात - कोरोना व्हायरस महिती

कोरोनातून बरे व्हावे वाटत असेल तर भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवा. योग्यवेळी योग्य उपचार घेतला, तर आपण सहजपणे कोरोनावर विजय मिळवू शकतो, असाच कोरोनावर विजय मिळवला आहे तो संगमनेरमधील आजी-आजोबांनी..

आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
author img

By

Published : May 3, 2021, 3:25 PM IST

Updated : May 3, 2021, 5:19 PM IST

अहमदनगर - कोरोना आजारातून बरे व्हावे असे वाटत असेल तर भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवा. योग्यवेळी योग्य उपचार घेतला, तर आपण सहजपणे कोरोनावर विजय मिळवू शकतो. असाच कोरोनावर विजय मिळवला आहे तो संगमनेरमधील आजी-आजोबांनी..

आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
'मनात कुठलीही भीती न ठेवता योग्यवेळी उपचार घ्यावा'

संगमनेर येथील साईनाथ चौकातील रिषभ गोल्ड व डायमंड दुकानाचे मालक सामाजिक कार्यकर्ते सुधीर दिगंबर मैड यांच्या आई आणि वडिलांचे जास्त वय असून देखील कोरोनाला हरवले आहे. मैड दाम्पत्याच्या साहस व धैर्यास खरं तर सलाम करायला हवा संगमनेरातील 94 वर्षीय दिगंबर विठ्ठल मैड तसेच 90 वर्षीय सुलोचना दिगंबर मैड या वयोवृद्ध आजी-आजोबांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. आजी-आजोबांचे मैड परिवार व नातेवाईकांच्या वतीने औक्षण करत फुलांची वर्षाव आणि घरातील लहान मुलांनी थाळी वाजवून स्वागत केले आहे. आजी-आजोबांना गोड धोड आंबरसाचे जेवण भरवण्यात आले. अश्याप्रकारे झालेले अनोख्या स्वागताने मैड आजी-आजोबा सुखावले आहेत. कोरोनाला हरवायाचे असेल, तर मनात कुठलीही भीती न ठेवता योग्य वेळी योग्य उपचार घ्यावा आणि या काळात आहार देखील तितकाच महत्वाचा आहे. कुठलाही आजार अंगावर काढू नका, प्रशासनानाने सांगितलेल्या सर्वच नियमांचे तंतोतंत पालन आपण सर्वांनी करायला हवे. कोरोना झालेल्या रुग्णास आपण सर्वांनी धीर दयावा, असा विश्वास सुधीर मैड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - कोरोनाबाधितांचे प्रमाण चार ते सहा आठवड्यांत कमी होईल-आयसीएमआर वैज्ञानिक

Last Updated : May 3, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.