ETV Bharat / state

संगमनेर तालुक्यातील 63 गावे कोरोनामुक्त - Sangamner corona news

संगमनेरमधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यात नागरिकांच्या सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या असून 63 गावे कोरोना मुक्त झाली आहेत.

बाळासाहेब थोरात
संगमनेर तालुक्यातील 63 गावे कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 3, 2021, 7:15 PM IST

अहमदनगर - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यात नागरिकांच्या सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या असून 63 गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तर 29 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

संगमनेर तालुक्यात 171 गावे व 263 वाड्या-वस्त्या

देवकौठे ते बोटा असे 100 किलोमीटरच्या विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात 171 गावे व 263 वाड्या-वस्त्या आहेत. पुणे, नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यांसह संगमनेरमध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यामुळे संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी संगमनेरात येत असत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्य पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या थांबवण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाला सूचना देत होते.

संगमनेर पॅटर्नमुळे लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले
यानुसार संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या. याच बरोबर घरोघर नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावात ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या संगमनेर पॅटर्नमुळे लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटल करीता चार अ‌ॅम्बुलन्स, पाच बायपप मशीन, तालुकास्तरावरील पहिले आरटीफीसीआर मशीन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसह अनेक आधुनिक सुविधा वाढविण्यात आल्या. याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासाठी ही विशेष मोहिम राबवली गेली.

ही गावे कोरोनामुक्त
या विविध उपाययोजनांमुळे आज संगमनेर तालुक्यातील 63 गावे कोरोनामुक्त झाली असून 29 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. कोरोना मुक्त गावांमध्ये आभाळवाडी, आंबी दुमाला, आंबी खालसा, आश्वी खु, आरामपूर, औरंगपूर, आजमपूर, बाळापुर, बांबळेवाडी, भोजदरी, बिरेवाडी, बोरबन, चनेगाव, चिकनी, चिंचपुर बुद्रुक, चिंचपूर खुर्द, दाढ, दरेवाडी, देवकौठे, ढोलेवाडी, धुपे, डोळासणे, आनंदवाडी, हसनाबाद, हिवरगाव पठार, जांबुत खुर्द, जुनेगाव, काकडवाडी, कनकापूर, कणसेवाडी, करुले, कवटेवाडी, कौठे मलकापूर, काळेवाडी, खांडगेदरा, खरशिंदे, कोकणेवाडी, कोंची, कुंभारवाडी, कुरण, कुरकुंडी, कुरकुटवाडी, महालवाडी, मालेगाव पठार, मांची, मेंगाळवाडी, म्हसवंडी, नांदुरी दुमाला, निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बुद्रुक, पारेगाव बुद्रुक, पेमरेवाडी, प्रतापपूर ,रायते ,सारोळे पठार, सावरगाव घुले, शेळकेवाडी, शेंडेवाडी, शिंदोडी, शिरसगाव, विद्यानगर , वनकुटे, वडझरी खु. या गावांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.