शिर्डी : साईबाबांच्या चरणी भाविकांनी केलेले भरभरून दान साईनगरीत चर्चेचा विषय ठराला आहे. गेल्या दीड महिन्यात चाई चरणी भाविकांनी 47 कोटींची देणगी अर्पण केली आहे. यात सव्वा कोटींचे सोने तर, 28 लाख रुपयांच्या चांदीचा समावेश आहे.
25 एप्रिल ते 15 जून या दीड महिन्याच्या कालावधीत भाविकांनी हे दान केले आहे. तसेच या कालावधीत साई चरणी तब्बल 26 लाख भाविक नतमस्तक झाल्याची माहिती साई संस्थानने दिली आहे. यात 5 लाख भाविकांनी सहशुल्क व्हीव्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतला तर, दर्शन लाईनमध्ये 21 लाख भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले आहे.
तब्बल 26 लाख भाविक साई चरणी नतमस्तक : साईबाबांच्या चरणी वर्षभरात करोडो भाविक हजेरी लावतात. त्यात सन उत्सव आणि सुट्यांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या वर्षी 25 एप्रिल ते 15 जून या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल 26 लाख भाविक साई चरणी नतमस्तक झाले. या भाविकांनी साईचरणी रेकॉर्ड ब्रेक दान दिले आहे. या दीड महिन्याच्या कालावधीत 47 कोटीच दान आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने दोन हजाराच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ह्या दीड महिन्याच्या कालावधीत साईभक्तांनी साईचरणी दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा दान केल्या आहेत.
भक्तांनी दिलेली देणगी : देणगी काउंटरवर 25 कोटी 89 लाख 70 हजार 382 रुपयांचे दान, डेबिट क्रीडेट कार्डद्वारे 5 कोटी 15 लाख 28 हजार 755 रुपयांचे दान, ऑनलाईन देणगीद्वारे 3 कोटी 34 लाख 44 हजार 543 रुपयांचे दान, चेक डीडीच्या माध्यामातून 1 कोटी 82 लाख 61 हजार 806 रुपयांचे दान, मनी ऑर्डरच्या माध्यमामधून 27 लाख 37 हजार 19 रुपयांचे दान, 1 कोटी 17 लाख 59 हजार 125 रुपयांचे 2 दोन किलो सोने साई चरणी. 28 लाख 49 हजार 88 रुपयांची 52 किलो चांदी साईबाबांच्या चरणी भक्तांना दिली असे, एकूण 47 कोटी 78 लाख रुपयांची देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे.
व्हीव्हीआयपी देणगी : व्हीव्हीआयपी दर्शनाच्या माध्यमातून 4 लाख 23 हजार 511 भाविकांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून 8 कोटी 30 लाख 57 हजार 997 रुपय साई संस्थानला प्राप्त झाले आहे. व्हीव्हीआयपी आरतीच्या माध्यमातून 70 हजार 578 भाविकांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून 3 कोटी 24 लाख 49 हजार संस्थानला प्राप्त झाले आहेत.