ETV Bharat / state

नगरमध्ये २४ परदेशी तबलिगींना अटक; पर्यटन व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघड

तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. हे २४ परदेशी नागरिक जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती होते. आज त्यांना नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

author img

By

Published : Apr 18, 2020, 8:34 AM IST

Updated : Apr 18, 2020, 10:06 AM IST

ahmednagar
अहमदनगर

अहमदनगर- दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावून नगरमध्ये आलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचा क्वॉरेंटाईन कालावधी संपल्यानंतर लगेत २४ परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. हे २४ परदेशी नागरिक जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती होते. आज त्यांना नगरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटींचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यामुळे नगरला आलेले २४ परदेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी एकूण 29 जणांना अटक केली. यात 24 विदेशी तर पाच भारतीय दुभाषांचा समावेश आहे. हे 24 विदेशी नागरिक जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्रूनेई येथील आहेत. दिल्लीतील मरकजहून नगर जिल्ह्यात एकूण 35 तबलीगी आले होते. यात 29 विदेशी नागरिकांचा समावेश होता.

जामखेड, नेवासे, भिंगार कॅम्प येथून या सर्व 35 जणांना पोलिसांनी शोधून कोरोना तपासणी केली असता, यातील पाच विदेशी हे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 24 विदेशी आणि पाच भारतीय दुभाषी (भाषांतराचे काम करणारे) यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली होती. या सर्वांना चौदा दिवस क्वॉरेंटाईनकरून नंतर पुन्हा तपासणी केली असता त्यांचे अहवाल पुन्हा निगेटिव्ह आल्याने त्यांना काल जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ त्यांना अटक केली.

Last Updated : Apr 18, 2020, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.