ETV Bharat / state

गुरुवारी जगातील 21 देशांतील लाखो साईभक्त घर तिथे साई चरित्र उपक्रमात होणार सहभागी - लेटेस्ट न्यूज इन शिर्डी

साईनिर्माण उद्योग समूहाच्या माध्यमातून आजवर देशाच्या विविध भागात दीड हजार गावात सामुदायिक साईचरित्राचे पारायण आयोजित करून साईचरित्र वाचनाची मोठी चळवळ उभी केली आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत महामारीचे संकट दूर केल्याचा दाखला साईचरित्रात आहे. याच पार्श्वभूमीवर साई चरित्र उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Shirdi
साईचरित्राचे पारायण
author img

By

Published : Jun 10, 2020, 4:28 PM IST

शिर्डी - करोनाने जगाला बंदीशाळा केल्याने संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करून या महाभयंकर आजारावर औषध शोधण्यासाठी धडपड करत आहेत. आता विज्ञानाला अध्यात्माची जोड देत करोना योद्ध्यांना आत्मबळ मिळण्यासाठी साई निर्माण ग्रुपच्यावतीने महिनाभरापासून घर तेथे साईचरित्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्या (गुरुवारी) भारतासह जगातील 21 देशांतील लाखो साईभक्त या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी दिली.

शिर्डीतील साईनिर्माण उद्योग समूहाच्या माध्यमातून आजवर देशाच्या विविध भागात दीड हजार गावात सामुदायिक साईचरित्राचे पारायण आयोजित करून साईचरित्र वाचनाची मोठी चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून लाखो साईभक्तांचा साईनिर्माण परिवारासोबत जोडले गेले आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत महामारीचे संकट दूर केल्याचा दाखला साईचरित्रात आहे. याच पार्श्वभूमीवर साईनिर्माणचे विजय कोते यांनी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि साईनिर्माणच्या सदस्यांच्या मदतीने शिर्डीतून घर तेथे साईचरित्र पारायणाची सुरवात केली.

या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्याची व्याप्ती वाढत जावून दुसर्‍या गुरूवारी जिल्ह्यात व तिसर्‍या गुरूवारी संपूर्ण राज्यात चार लाखांच्यावर साईभक्तांनी घरात बसून साईचरित्राचे वाचन केले. कोरोना योद्ध्यांना आत्मबळ मिळण्यासाठी साईबाबांना या पारायणाच्या माध्यमातून साकडे घातले जात असल्याचे विजय कोते यांनी सांगितले.

गुरूवारी होणाऱ्या पारायणासाठी देशातील साईभक्त त्याचप्रमाणे अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, मलेशिया, केनिया, तांजाविया, युगांडा, श्रीलंका, नेपाळ, आखाती राष्ट्रे, ओमान, कतार, जर्मनी, तैवान, बार्बाडोस, मॉरीशस, फीजी, इंडोनेशिया, सिंगापूर आदी विदेशातील साईभक्त विश्वविक्रमी घर तेथे साईचरित्र पारायणात सहभागी होणार असल्याची माहिती कोते यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.