अहमदनगर - नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नागपूर येथील एका भाविकाने शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण मंडित शंख अर्पण केला आहे. या शंखाची किंमत जवळपास पंधरा लाख रुपये आहे. रक्षी शर्मा (दिल्ली) असे या भाविकाचे नाव आहे.
दुपारच्या मध्यान्ह आरतीपूर्वी शर्मा कुटुंबाने हा सुवर्णमंडीत शंख संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी, राजेंद्र जगताप आदींची उपस्थिती होती. शर्मा कुटुंबाने यापूर्वी शताब्दी वर्षात 10 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा डबाही शिर्डीच्या साईबाबांना अर्पण केला आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई
सुवर्णमंडीत शंख आहे तरी कसा?
हा शंख पांढराशुभ्र आहे. यावर सुमारे साडेबारा लाख रुपये किंमतीचे आणि 30 तोळ्याचे सुवर्ण नक्षीकाम करण्यात आले आहे. मजुरी सह या शंखाची किंमत 15 लाख रुपये आहे. रोज काकड आरतीला शंखातून साई मूर्ती आणि समाधीला जलधारेने स्नान घालण्यात येते. यापुढे आता हा शंख वापरण्यात येणार आहे.